महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित
By Admin | Updated: April 22, 2015 05:55 IST2015-04-22T03:58:23+5:302015-04-22T05:55:35+5:30
नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमाला, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित
नवी दिल्ली : नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमाला, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या ‘पीक व किटक देखरेख व सल्लागार प्रकल्पास तथा अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पश्चिम त्रिपुरात असतांना मांडवी ब्लॉक येथे राबविलेल्या आर्थिक समावेशन प्रकल्पातील योगदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ‘पंतप्रधान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण काम करणा-या अधिका-यांना दरवर्षी २१ एप्रिल रोजी ‘नागरी सेवा दिनी’ ‘पंतप्रधान पुरस्कार’ देण्यात येतात. येथील विज्ञानभवनात प्रशासन सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्र मात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार प्रदान केले. एक लाख रु पये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरु प आहे.
सांघिक श्रेणीतील पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास कार्यक्र मासाठी प्रदान करण्यात आला. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रंजीत कुमार, नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, टी.एस.के. रेड्डी, पी.बी.देशमाने आणि वाय.एस.शेंडे या अधिकाऱ्यांनी सांघिक स्तरावर केलेल्या कामांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.