सोनिया गांधी नगरात प्रशासनाचा सर्वे

By Admin | Updated: August 15, 2015 00:27 IST2015-08-15T00:27:26+5:302015-08-15T00:27:26+5:30

नागपूर : गुरुवारच्या पुरामुळे नागनदीला लागून असलेल्या पूर्व नागपूरच्या सोनिया गांधी नगर झोपडप˜ीतील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या वस्तीतील २५० च्या वर घरांमध्ये पाणी घुसले होते. लोकमतने या वस्तीतील परिस्थितीचे वृत्त दिले होते. यानंतर शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्या टीमने या भागात सर्वे करून नुकसानग्रस्तांच्या नावाची नोंद केल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र काहीजण कामावर गेल्याने त्यांचे नाव सुटल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात पाणी स्वच्छ करण्याच्या गोळ्या वितरित करण्यात आल्या. मात्र फवारणी न केल्याने नाल्याच्या पाण्याची दुर्गंधी कायम होती.

Administration survey in Sonia Gandhi city | सोनिया गांधी नगरात प्रशासनाचा सर्वे

सोनिया गांधी नगरात प्रशासनाचा सर्वे

गपूर : गुरुवारच्या पुरामुळे नागनदीला लागून असलेल्या पूर्व नागपूरच्या सोनिया गांधी नगर झोपडपट्टीतील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या वस्तीतील २५० च्या वर घरांमध्ये पाणी घुसले होते. लोकमतने या वस्तीतील परिस्थितीचे वृत्त दिले होते. यानंतर शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्या टीमने या भागात सर्वे करून नुकसानग्रस्तांच्या नावाची नोंद केल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र काहीजण कामावर गेल्याने त्यांचे नाव सुटल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात पाणी स्वच्छ करण्याच्या गोळ्या वितरित करण्यात आल्या. मात्र फवारणी न केल्याने नाल्याच्या पाण्याची दुर्गंधी कायम होती.
दुसरीकडे लोकांची शाळा परिसरात असलेल्या गुलाबबाबा मठ झोपडपट्टीमध्ये जिल्हा प्रशासनाचे किंवा मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी पोहचले नसल्याचे येथील नागरिक जयश्री गोईकर यांनी सांगितले.

Web Title: Administration survey in Sonia Gandhi city