शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रानंतर सूर्याकडे झेप; आदित्य-L1 यानाची चाचणी पूर्ण, ISRO ने दिले मोठे अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 19:15 IST

ISRO Solar Mission: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचे आदित्य-L1 मिशन 2 सप्टेंबर रोजी लॉन्च केले जाईल.

Aditya-L1 Mission Launch: भारताच्या महत्वकांशी चंद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोची (ISRO) थेट सूर्याकडे झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या आदित्य-एल1 मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. रॉकेटची प्रक्षेपण तालीम (लॉन्च रिहर्सल) आणि तपासणी पूर्ण झाल्याची माहिती इस्रोने बुधवारी (30ऑगस्ट) दिली.

ISRO ने ट्विट(x) करुन सांगितले की, "PSLV-C57/Aditya-L1 मिशनच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू आहे. प्रक्षेपणाची तालीम - वाहनाची अंतर्गत चाचणी पूर्ण झाली आहे. ही मोहीम 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केली जाणार आहे." 

सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली मोहीमआदित्य-एल1 अंतराळयान सूर्याच्या सभोवतालचे वातावरण आणि एल1 (सूर्य-पृथ्वी लॅग्रेंजियन पॉइंट) वरील सौर वाऱ्याचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे यान पृथ्वीपासून अंदाजे 1.5 मिलियन किलोमीटर अंतरावर स्थिरावेल. सूर्याचा अभ्यास करणारी ही भारताची पहिलीच मोहीम आहे.

आदित्य-एल1 मिशन काय शोधेल?'L1' भोवतीच्या कक्षेतून सूर्याचा अभ्यास करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आदित्य-एल1 हा राष्ट्रीय संस्थांच्या सहभागाने तयार झालेले स्वदेशी यान आहे. वेगवेगळ्या वेव्हबँड्समधील सूर्याचे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याभोवतालच्या वातावरणाचे निरीक्षण करण्यासाठी त्यात सात पेलोड असतील.

 

टॅग्स :isroइस्रोIndiaभारतChandrayaan-3चंद्रयान-3scienceविज्ञान