शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! इस्रोचं आदित्य-एल१ निश्चितस्थळी पोहचलं; आता भारत सूर्याचा अभ्यास करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 17:50 IST

Aditya-L1: आदित्य एल१चा प्रवास २ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू झाला होता.

Aditya-L1 (Marathi News) इस्रोने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा इतिहास रचला आहे. इस्रोने सुर्याच्या अभ्यासासाठी पाठविलेले आदित्य एल१ उपग्रह निश्चितस्थळी पोहोचले आहे. एल१ म्हणजेच लैग्रेंज पॉईंट १ (एल १) जवळ हॅलो कक्षेमध्ये आदित्य एल १ आज पोहचलं आहे. यामुळे इस्रोला मोठं यश मिळालं आहे.

पृथ्वीपासुनचे आदित्यचे हे अंतर सुर्यापासूनच्या पृथ्वीच्या एकूण अंतराच्या केवळ १ टक्के एवढे आहे. या कक्षेतून सुर्याच्या उष्णतेपासून दूर राहत सुर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवता येते. आता पृथ्वीपासून भारतातील पहिल्या सौर वेधशाळेचे अंतर १५ लाख किमी आहे. ४०० कोटी रुपयांचे हे मिशन आता भारतासह संपूर्ण जगाच्या उपग्रहांचे सौर वादळांपासून संरक्षण करेल.

आदित्यचा प्रवास २ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू झाला होता. पाच महिन्यांनंतर, ६ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी, हा उपग्रह एल१ पॉइंटवर पोहोचला. या बिंदूभोवतीचा सौर प्रभामंडल कक्षेत तैनात करण्यात आला आहे. आदित्य-एल१ उपग्रहाचे थ्रस्टर्स हॅलो ऑर्बिटमध्ये ठेवण्यासाठी काही काळ चालू करण्यात आले. यात एकूण १२ थ्रस्टर्स आहेत. आदित्य एल१ मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट-

इस्रोच्या या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. भारताने आणखी एक टप्पा पूर्ण केला. भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य एल१ हे उपग्रह निश्चितस्थळी पोहोचले आहे. आमच्या शास्त्रज्ञांनी अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले. त्याचेच हे यश आहे. संपूर्ण देश या कामगिरीसाठी शास्त्रज्ञांचे अभिनंदन व्यक्त करत असताना मी देखील त्यात सामील होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आम्ही मानवतेसाठी विज्ञानाच्या नवीन सीमा पार करत राहू, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

आदित्य एल१ चे उद्दिष्ट काय?

सौर वातावरणाची गतिशीलता समजून घेण्यासाठी, सूर्याच्या कोरोनाची उष्णता, सौर भूकंप किंवा सूर्याच्या पृष्ठभागावरील 'कोरोनल मास इजेक्शन' (CMEs), सौर वादळांशी संबंधित क्रियाकलाप आणि त्यांची वैशिष्ट्ये आणि पृथ्वीच्या जवळच्या अंतराळातील हवामानविषयक समस्या आदी जाणून घेणे हे या आदित्य एल१ चे उद्दिष्ट आहे. 

टॅग्स :Aditya L1आदित्य एल १isroइस्रोIndiaभारत