शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

मोठी बातमी! आदित्य-एल 1 ने सुरू केला वैज्ञानिक प्रयोग, सर्व रहस्य उलगडणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 15:05 IST

Aditya-L1 Mission: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ISRO ने पाठवलेल्या यानाने प्रयोग सुरू केला आहे.

Aditya-L1 Starts Scientific Experiments: भारतीय अंतराळ संस्था, ISRO ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठवलेल्या आदित्य एल-1 ने मोठी बातमी दिली आहे. आदित्य-एल1 ने आपला वैज्ञानिक प्रयोग सुरू केला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने पाठवलेल्या पहिल्या अंतराळ-आधारित सौर वेधशाळेवरील रिमोट सेन्सिंग पेलोडने पृथ्वीपासून 50,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील सुपरथर्मल आयन किंवा अतिशय ऊर्जावान कण आणि इलेक्ट्रॉन मोजणे सुरू केले आहे.

इस्रोने X वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. इस्रोने मिशन अपडेटमध्ये म्हटले की, सुप्रा थर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर (STEPS) नावाच्या उपकरणाच्या सेन्सरने वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या डेटामुळे वैज्ञानिकांना पृथ्वीभोवतीच्या कणांचे विश्लेषण करण्यात मदत होईल.

आज रात्री आदित्य L1 पृथ्वी सोडणार आदित्य L1 त्याच्या मिशनचा महत्त्वाचा टप्पा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. इस्रोने म्हटले की, अंतराळयान सोमवारी मध्यरात्री ट्रान्स-लॅग्रॅन्जियन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I)मधून जाईल. TL1 इन्सर्शन हे पृथ्वीच्या कक्षेतून प्रक्षेपण आहे, जे 19 सप्टेंबर रोजी IST पहाटे 2:00 वाजता केले जाईल. हे पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्य-पृथ्वी लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) च्या अंदाजे 110 दिवसांच्या प्रवासाची सुरुवात करेल.

2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या आदित्य-एल1 मिशनचे उद्दिष्ट सूर्याचे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि कोरोनाचा अभ्यास करणे आहे. हे अवकाशातील हवामानाची गतिशीलता आणि कणांची तपासणी करेल. अंतराळयान TL1I सह L1 बिंदूच्या दिशेने प्रवास सुरू करेल.

टॅग्स :isroइस्रोIndiaभारतNASAनासाChandrayaan-3चंद्रयान-3