शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

Adhir Ranjan Chowdhury: "आमच्याकडे 700 आमदार, तृणमूलचं काय?", ममता बॅनर्जींच्या टीकेवर काँग्रेस नेत्याचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 12:41 IST

Adhir Ranjan Chowdhury on Mamata Banerjee: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जींनी काँग्रेसवर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी पलटवार केला आहे.

नवी दिल्ली: 10 मार्च रोजी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result) लागला. त्या निकालात पाचपैकी चार राज्यात भारतीय जनता पक्षाने (BJP) सत्ता राखली, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने(AAP) काँग्रेसचा(Congress) दारुण पराभव केला. त्यानंतर आता काँग्रेसवर जोरदार टीका होत आहे. संपूर्ण देशात फक्त दोन राज्यात काँग्रसचे सरकार आहे. काँग्रेसच्या या पराभवानंतर राजकारण चांगलेच तापले असून, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

'काँग्रेसने विश्वासार्हता गमावली'माध्यमांशी बोलताना ममतांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ''मला वाटते की, भाजपशी लढण्यास इच्छुक असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम करायला हवे. काँग्रेसने त्यांची विश्वासार्हता गमावली, त्यांच्यावर आता अवलंबून राहण्यात काहीही अर्थ नाही. काँग्रेसचा सर्वच ठिकाणी दारुण पराभव होत आहे, त्यांना जिंकण्यात काडीमात्र रस दिसत नाही'', अशी खोचक टीका ममतांनी केली होती. 

काँग्रेस नेत्याचा ममतांवर पलटवारममतांच्या टीकेनंतर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी पलटवार केला. 'ममता बॅनर्जी भाजपच्या एजंट आहेत. संपूर्ण भारतभर काँग्रेसला मोठा पाठिंबा आहे. विरोधकांच्या एकूण मतांपैकी 20 टक्के मते एकट्या काँग्रेसकडे आहेत. ममतांनी विसरू नये की, काँग्रेसमधूनच ममता आणि तृणमूलचा जन्म झाला आहे. आजही राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय राजकारणात तृणमूल काँग्रेसचे स्थान कुठे आहे?'' असा सवाल चौधरी यांनी केला.

'आमच्याकडे 700 आमदार'अधीर रंजन पुढे म्हणाले की, ''वेड्या लोकांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही. संपूर्ण भारतात काँग्रेसचे 700 आमदार आहेत. ममतांकडे आहेत का तिवढे आमदार? विरोधी पक्षांच्या एकूण मतांपैकी 20 टक्के मते काँग्रेसकडे आहेत. दीदींकडे आहे का? भाजपला खूश करण्यासाठी आणि त्यांचे एजंट म्हणून काम करण्यासाठी दीदी असे बोलत आहेत. तिकडे गोव्यामध्येही तृणमूलने भाजपसाठी काम केले. तृणमूल नसते, तर गोव्यात आज आमची सत्ता आली असते. त्यामुळे भाजपविरोधातील आघाडी काँग्रेसशिवाय होऊच शकत नाही'', असेही चौधरी म्हणाले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपा