आडगाव वि.का. सोसायटी बिनविरोधसाठी हालचाली
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
आडगाव, ता. एरंडोल : आडगाव वि.वि. कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक लागली असून १३ जागांपैकी एनटी संवर्गातील एक जागा बिनविरोध झाली असून राजेंद्र फनसे यांचा एकमेव अर्ज आहे. उर्वरित १२ जागांमध्ये कर्जदार खातेदार ८, महिला २, इमा १, अजा/अज १ अशा १२ जागांसाठी एकूण ४६ वैध अर्ज असून २७ फेब्रुवारी रोजी माघारीचा शेवटचा दिवस आहे.

आडगाव वि.का. सोसायटी बिनविरोधसाठी हालचाली
आ गाव, ता. एरंडोल : आडगाव वि.वि. कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक लागली असून १३ जागांपैकी एनटी संवर्गातील एक जागा बिनविरोध झाली असून राजेंद्र फनसे यांचा एकमेव अर्ज आहे. उर्वरित १२ जागांमध्ये कर्जदार खातेदार ८, महिला २, इमा १, अजा/अज १ अशा १२ जागांसाठी एकूण ४६ वैध अर्ज असून २७ फेब्रुवारी रोजी माघारीचा शेवटचा दिवस आहे.त्याअगोदर निवडणूक बिनविरोध करता येईल काय यासाठी प्रयत्न सुरू असून १६ रोजी रात्री ७ वाजता सोसायटीच्या छतावर मीटिंग घेण्यात आली. त्यात संस्थेचे चेअरमन प्रवीण वाघ यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रस्ताव मांडला. यात सुदाम पाटील, गुलाबराव महाजन, डी.एन. पाटील, पाटील, मोहनदास महाजन, ए.एस. पाटील यांनी विचार मांडले. यात शालिग्राम बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाच लोकांची कमेटी स्थापन करावी व या कमेटीने संस्था बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत. तत्पूर्वी सर्व उमेदवाराांचे माघारीचे अर्ज कमेटीच्या स्वाधीन करून सर्वसंमतीने तोडगा काढून फक्त १२ उमेदवारांचे अर्ज ठेवून निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न करावे असे ठरले.याप्रसंगी शालिग्राम पाटील, मधुकर पाटील, उत्तम पाटील, डॉ. सुधाकर महाजन, निंबा पाटील, प्रल्हाद साबळे, पंडित, साबळे, नामदेव पाटील यांच्यासह इतर सभासद मोठ्या संख्येने हजर होते. आडगावच्या संपूर्ण परिसरामध्ये आडगावच्या निवडणुकीवर लक्ष असते. नेहमी चुरशीने होत असलेली निवडणूक बिनविरोध होणे शक्य आहे का? झाली तर परिसरामध्ये एक नवा आदर्श घालून देऊ शकतो, अशी चर्चा जनमानसात आहे.