शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोळसासाठा पुरेसा, वीजटंचाई नाही, केंद्र सरकारचा दावा, अमित शहा यांच्याकडे झाली तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 07:06 IST

Electricity crisis in india: कोळशाची टंचाई बिकट असून त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होईल, असे चार दिवसांपूर्वी सांगणाऱ्या आर. के. सिंग यांनी आज मात्र कुठेही वीजटंचाई निर्माण होणार नाही, असा दावा केला. कोळसा मंत्री प्रल्हादभाई जोशी यांनीही देशात कोळशाची टंचाई नाही, असे ठामपणे सांगितले.

नवी दिल्ली : कोळशाअभावी राज्यातील अनेक वीजनिर्मिती संच बंद पडल्याचे आणि अनेक राज्यांत वीजटंचाईची शक्यता असल्याचे वृत्त येताच राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोळसा मंत्री, ऊर्जामंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची सोमवारी घाईघाईने बैठक बोलावली. कोळशाची टंचाई बिकट असून त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होईल, असे चार दिवसांपूर्वी सांगणाऱ्या आर. के. सिंग यांनी आज मात्र कुठेही वीजटंचाई निर्माण होणार नाही, असा दावा केला. कोळसा मंत्री प्रल्हादभाई जोशी यांनीही देशात कोळशाची टंचाई नाही, असे ठामपणे सांगितले.महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, आंध्र प्रदेश आदी राज्यांनी कोळशाचा पुरवठा पुरेसा नसल्याच्या तक्रारी केंद्राकडे केल्या होत्या. वीज पुरवठा बंद झाला, तर उद्योगधंदे बंद होतील, असेही या राज्यांनी कळविले होते. त्याची केंद्राने लगेचच दखल घेतली. कोणत्याही राज्याला कोळसा कमी पडू देणार नाही आणि वीजटंचाईही भासू देणार नाही, असे दोघा मंत्र्यांनी अमित शहा यांच्याकडील बैठकीत स्पष्ट केले. 

५०० मेगावॅटचा संच आजपासून सुरू होणारमुंबई : राज्यात सरासरी दोन दिवस पुरेल इतकाच कोळसासाठा असल्याचे महानिर्मितीचे म्हणणे आहे. उपलब्धतेत वाढ होऊन लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल, अशी अपेक्षाही आहे. त्यांच्या एकूण पाच बंद वीजनिर्मिती संचांपैकी भुसावळचा ५०० मेगावॅटचा संच मंगळवारपासून सुरू होईल. कोळसासाठ्यात ४ ऑक्टोबरपासून सुधारणा होऊ लागली आहे. सरासरी दररोज एक लाख मेट्रिक टन इतक्या कोळशाची आवक सुरू होती. त्यात आता वाढ होत आहे.

टॅग्स :electricityवीजIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारCoal Shortageकोळसा संकट