शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या सीमेवर तैनात केले अतिरिक्त ५० हजार सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 11:15 IST

भारताचे एकूण दाेन लाख सैनिक तैनात

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीनच्या वाढत्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने प्रथमच अतिशय आक्रमक पावित्रा घेतला आहे. भारताने चीनच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी ५० हजार अतिरिक्त सैनिकांना तैनात केले आहे. त्यामुळे चीनवर नजर ठेवण्यासाठी तब्बल २ लाखांहून अधिक सैन्य सीमेवर तैनात आहे. चीनच्या सीमेवरील वेगवेगळ्या भागात भारताने लष्कर आणि लढाऊ विमाने तैनात केलेली आहेत. गेल्या वर्षभरात भारताने चीनच्या सीमेवर सैनिकांची  संख्या वाढविली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ४० टक्के अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पाकिस्तानसाेबत असलेला तणाव शांतपणे हताळण्याची भूमिका घेतानाच चीनला प्रत्युत्तर देण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे.

आक्रमक प्रत्युत्तर?आतापर्यंत भारताची भूमिका केवळ चीनच्या हालचाली राेखण्यापुरती मर्यादित हाेती. मात्र, अतिरिक्त सैनिकांच्या तैनातीमुळे भारताने पावित्रा बदलल्याचे दिसत आहे. या चालीमुळे गरज भासल्यास आक्रमक प्रत्युत्तर देता येईल. ‘रक्षणासाठी आक्रमण’ या धाेरणानुसार चीनमधील भूभागही काबीज करण्याचा पर्याय भारतीय लष्करासमाेर राहणार आहे. 

काश्मीर, लडाखला बाहेर दाखविणारा नकाशा हटविलानवी दिल्ली : ट्विटरने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. जम्मू- काश्मीर आणि लडाखला त्याने स्वतंत्र देश म्हणून नकाशात दाखवले मात्र, देशातून होत असलेल्या मोठ्या विरोधानंतर ट्वीटरने हा नकाशा हटविला आहे.  ट्विटरने भारताचा विपर्यस्त नकाशा दाखवण्याची ही काही पहिली वेळ नाही. मागच्या वर्षी केंद्र सरकारने ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भारताच्या विपर्यस्त नकाशाबद्दल पत्र लिहून तीव्र नापसंती व्यक्त केली होती.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनladakhलडाख