महिला मुक्ती दिन जोड

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:33+5:302015-01-03T00:35:33+5:30

वेळेवर जेवण न देणे, अपमानास्पद वागणूक देणे, टोचून बोलणे, मारहाण करणे, जास्तीचे काम देणे अशा विविध प्रकारे छळ होत असल्याच्या आणि न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यता कक्षाकडे होत आहेत़ या तक्रारी करणार्‍यांमध्ये शिक्षित महिलांचे प्रमाण अधिक आहे़ एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत जिल्‘ातील सुमारे ७५७ महिलांनी पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशीच लढा देऊन नेहमीच होणार्‍या छळातून मुक्ती मिळविली आहे़ महिला सहाय्यता कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांनी २८२ महिलांचे पती, सासू-सासरे व अन्य नातेवाईक यांचे समुपदेशन करुन पीडित महिलांना न्याय मिळवून दिला आहे़ तर २१५ महिलांनी कोर्टाच्या माध्यमातून कौटुंबिक छळातून मुक्तता करुन घेतली आहे़ एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत महिला सहाय्यता क

Addition of women's liberation day | महिला मुक्ती दिन जोड

महिला मुक्ती दिन जोड

ळेवर जेवण न देणे, अपमानास्पद वागणूक देणे, टोचून बोलणे, मारहाण करणे, जास्तीचे काम देणे अशा विविध प्रकारे छळ होत असल्याच्या आणि न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यता कक्षाकडे होत आहेत़ या तक्रारी करणार्‍यांमध्ये शिक्षित महिलांचे प्रमाण अधिक आहे़ एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ७५७ महिलांनी पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशीच लढा देऊन नेहमीच होणार्‍या छळातून मुक्ती मिळविली आहे़ महिला सहाय्यता कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांनी २८२ महिलांचे पती, सासू-सासरे व अन्य नातेवाईक यांचे समुपदेशन करुन पीडित महिलांना न्याय मिळवून दिला आहे़ तर २१५ महिलांनी कोर्टाच्या माध्यमातून कौटुंबिक छळातून मुक्तता करुन घेतली आहे़ एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत महिला सहाय्यता कक्षाकडे आलेल्या तक्रारींपैकी ३५ प्रकरणांमध्ये समझोता होऊ शकलेला नाही़ त्यामुळे पोलीस ठाण्यात ३५ कौटुंबिक छळाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़

Web Title: Addition of women's liberation day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.