वारकर्यांच्या जीवा बातमीसाठी जोड
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30
मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्हयातील बेरडी गावातील विठ्ठल गायकवाड, गणपती भोगाटे, चिरकुट तुडापे, रामभाऊ काकडे हे वारीत सहभागी झाले आहेत. ते म्हणाले, जून महिन्यात पाऊस पडला. पिके उगवली पण आता पाऊसच गायब झालाय. त्यामुळे पिक जळू लागलीयेत. त्यामुळ चिंता वाटत आहे. कालपासून पाऊस पडू लागल्याचे घरून कळालय. त्यामुळे थोडा धीर मिळालाय. आता बघू काय होतय.

वारकर्यांच्या जीवा बातमीसाठी जोड
म ्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्हयातील बेरडी गावातील विठ्ठल गायकवाड, गणपती भोगाटे, चिरकुट तुडापे, रामभाऊ काकडे हे वारीत सहभागी झाले आहेत. ते म्हणाले, जून महिन्यात पाऊस पडला. पिके उगवली पण आता पाऊसच गायब झालाय. त्यामुळे पिक जळू लागलीयेत. त्यामुळ चिंता वाटत आहे. कालपासून पाऊस पडू लागल्याचे घरून कळालय. त्यामुळे थोडा धीर मिळालाय. आता बघू काय होतय.नांदेड जिल्हयाच्या मुखेड तालुक्यातील आलेले रामराम केंद्रे व तुळजापूरमधील मोहन शिंंदे म्हणाले, जुलै महिना आला तरी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पेरण्याच केल्या नाहीत. शेतात काहीच काम राहिलेले नाही. दरवर्षी वारीत बायको सहभागी व्हायची. पण आता शेतात काहीच काम नसल्याने मीही वारीत सहभागी झालोय.-----चौैकट---डोळयात पाणी...लातुर जिल्हयाच्या अहमदपूर तालुक्यातील कोपरा व सायगाव होट्टी गावातील नागीनबाई तरूडे आणि कंबलबाई नागरगोजे यांना शेतीची स्थिती विचारली तर ते सांगता सांगता दोघांच्या डोळयात पाणी आले. गेल्या २ वर्षापासून शेतात राबराब राबतोय. पण पावसाने ओढ दिल्याने उगवलेली पिके सुकून जात आहेत. गेल्यावर्षी घरातच्या वस्तू मोडून दुबार पेरणी केली. पण त्यानंतरही पाऊस न पडल्याने हातात काहीच आले नाही. यंदाही जूनच्या पावसाने पिके उगवली. पण आता पाऊस नाय. त्यामुळे उगवलेली पिके जळाली. आता काय करायच. दुबार पेरणी करायची म्हंटल तर पैसा हवा, तो कोठून आणायचा, विठ्ठलावर आता सगळ सोपवलय अन् वारीत सहभागी झालोय, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.