मुख्यमंत्र्यांवर भिरकावला जोडा
By Admin | Updated: January 6, 2015 02:42 IST2015-01-06T02:42:08+5:302015-01-06T02:42:08+5:30
बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यावर पाटणास्थित त्यांच्या निवासस्थानी आयोजित ‘जनता दरबारात’ सोमवारी एका युवकाने जोडा फेकल्याची घटना घडली़

मुख्यमंत्र्यांवर भिरकावला जोडा
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यावर पाटणास्थित त्यांच्या निवासस्थानी आयोजित ‘जनता दरबारात’ सोमवारी एका युवकाने जोडा फेकल्याची घटना घडली़ सुदैवाने हा जोडा मुख्यमंत्र्यांना लागला नाही़
जोडा भिरकावणाऱ्या या युवकाचे नाव अमृतोष कुमार आहे़ तो छपरा येथील राहणारा आहे़ प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मांझी जनता दरबारात लोकांच्या तक्रारी ऐकत असतानाच, अमृतोष उभा राहिला आणि रांग तोडून राज्य सरकार जातीच्या आधारावर समाजात फूट पाडत असल्याचा आरोप त्याने केला़ सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडल्याने कुमारने मांझी याच्ंया दिशेने जोडा भिरकावला़ सुदैवाने त्याचा निशाणा चुकल्याने तो मांझी यांच्या पायाजवळ पडला़ या घटनेनंतर लगेच अमृतोषला ताब्यात घेण्यात आले़ पोलिसांनी आपल्याला एका खोट्या प्रकरणात गोवले असून त्याचीच तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आलो होतो, असे त्याने सांगितले़ (वृत्तसंस्था)
४पाटणा : एकापाठोपाठ एक अशा अनेक वादग्रस्त विधानानंतर बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे़ ठेकेदारांकडून नक्षली वसूल करीत असलेल्या खंडणीचे त्यांनी कथितरीत्या समर्थन केले आहे़
४कंत्राटददार, ठेकेदारांचे काम खराब आणि निकृष्ट असेल तर अशांकडून नक्षली खंडणी वसून करीत असतील तर मला त्यात काहीही गैर वाटत नाही, असे मांझी सोमवारी म्हणाले़ त्यांच्या निवासस्थानी आयोजित ‘जनता दरबार’ कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़