शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

20 हजार कोटी कुठून आले? राहुल गांधींच्या आरोपानंतर अदानी ग्रुपने मांडला चार वर्षांचा हिशेब...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 19:30 IST

Adani Group Statement : विरोधकांकडून होत असलेल्या आरोपानंतर अदानी समूहाने आपला चार वर्षांचा हिशोब मांडला आहे.

Rahul Gandhi vs Adani Group: काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) केंद्र सरकारवर टीका करताना वारंवार उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना 'बेनामी कंपन्यांकडून' मिळालेल्या 20,000 कोटी रुपयांचा हिशेब विचारत आहेत. आता खुद्द अदानी समूहाने आपला चार वर्षांचा हिशोब मांडला आहे. गौतम अदानी ग्रुपचे म्हणणे आहे की, 2019 पासून ग्रुप कंपन्या सातत्याने त्यांचे स्टेक विकत आहेत. यातून $2.87 अब्ज (सुमारे 23,500 कोटी रुपये) इतकी रक्कम मिळाली आहे. यापैकी $2.55 अब्ज (सुमारे 20,900 कोटी रुपये) व्यवसाय विस्तारासाठी पुन्हा गुंतवले गेले आहेत.

राहुल गांधींचा आरोपहिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूह आधीच खूप अडचणीत आला आहे. यातच गौतम अदानींच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. संसदेतील त्यांच्या एका भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील संबंधांवरही प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सरकार गौतम अदानींना वाचवत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र, आता समूहाने 20,000 कोटी रुपयांचा हिशोबच मांडला आहे. 

20,000 कोटींचा हिशोबअदानी समूहाचे म्हणणे आहे की, अबू धाबीची स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट कंपनी इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने (IHC) अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये $2.59 अब्ज (सुमारे 21,000 कोटी) गुंतवणूक केली आहे. समूहाच्या प्रमोटर्सनी अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमधील हिस्सेदारी विकून $2.78 अब्ज (सुमारे 22,700 कोटी रुपये) उभारले आहेत.

समुहाने जारी केलेल्या निवेदनात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, स्टेक विकून मिळालेली ही रक्कम नवीन व्यवसायाच्या विकासासाठी गुंतवण्यात आली होती. यासह, प्रमोटर्सनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेड सारख्या कंपन्यांच्या वाढीसाठी पुन्हा गुंतवणूक केली.

फायनान्शियल टाइम्सच्या रिपोर्टचे खंडनअदानी समूहाने आपल्या निवेदनात 'फायनान्शिअल टाईम्स'च्या वृत्ताचेही खंडन केले आहे, जो राहुल गांधींच्या विधानांचा आधार आहे. याच अहवालात प्रश्न विचारण्यात आला होता की, अदानींच्या बेनामी कंपन्यांमध्ये अचानक 20 हजार कोटी रुपये आले कुठून? अदानी समूहाला पाडण्याची स्पर्धा असल्याचेही ते म्हणाले. तसेच, अदानी ग्रुप शेअर बाजाराशी संबंधित कायद्यांचे पूर्णपणे पालन करत असल्याचेही ग्रुपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा