अधिभारात कपात अदानी ग्रुपसाठी; काँग्रेसचा आरोप

By Admin | Updated: October 28, 2014 01:56 IST2014-10-28T01:56:55+5:302014-10-28T01:56:55+5:30

कोळसा आयातीवरील अधिभार कमी करण्याचा निर्णय हा सर्वसामान्यांसाठी नव्हे तर भाजपाचा कायम कैवार घेतलेल्या अदानी ग्रुपच्या फायद्यासाठी घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

For the Adani Group Congress allegation | अधिभारात कपात अदानी ग्रुपसाठी; काँग्रेसचा आरोप

अधिभारात कपात अदानी ग्रुपसाठी; काँग्रेसचा आरोप

पणजी : कोळसा आयातीवरील अधिभार कमी करण्याचा निर्णय हा सर्वसामान्यांसाठी नव्हे तर भाजपाचा कायम कैवार घेतलेल्या अदानी ग्रुपच्या फायद्यासाठी घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
कोळसा आयातीवरील अधिभार 25क् रुपये प्रति मेट्रिक टनावरून 5क् रुपये प्रति मेट्रिक टन करण्यामागचा राज्य सरकारचा खरा उद्देश वेगळाच आहे. कर्नाटकमधील स्टिल प्लांटसाठी आयात होणारा कोळसा गोव्यात अधिभार कमी केल्यामुळे मुरगाव बंदरातून मोठय़ा प्रमाणावर आयात केला जाईल. मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीची जबाबदारी पीपीपी तत्त्वावर अदानी ग्रुपकडे आहे. त्यामुळे राज्याला मिळणारा महसूल हा अदानी ग्रुपला मिळणार आहे. ही गोव्यातील जनतेची फसवणूक असून हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी केली. निर्णय मागे न घेतल्यास त्याला विरोध करण्यासाठी सर्व पर्याय हाताळले जातील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: For the Adani Group Congress allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.