शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Adani Files: राहुल गांधींना नाही, पण मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयात उत्तर द्यावेच लागणार; अदानींवर विचारलाय महत्वाचा प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 18:33 IST

Narendra Modi vs Rahul Gandhi: मोदींनी दुसऱ्याच दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणवर केलेल्या आभार प्रदर्शनात अदानींचे एकदाही नाव न घेता राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली होती.

जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून अदानींच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. अमेरिकेतील हिंडनबर्गने अदानी ग्रुपवर ८० प्रश्न उपस्थित केल्याने जगात दोन नंबरवर असलेले अदानी पहिल्या २० मध्येही राहिलेले नाहीत. या रिपोर्टनंतर अदानींच्या शेअर्समध्ये एवढी मोठी घसरण झाली की कंपन्यांचे बाजारमुल्य जवळपास निम्म्यावर आले. अदानी आणि मोदी यांच्या मैत्रीवरून काँग्रेसने लोकसभेत राडा घातला होता. राहुल गांधी यांनी देखील मोदी-अदानींचे फोटो दाखवून काही प्रश्न विचारले होते. परंतू, मोदींनी याला उत्तर दिले नव्हते. 

मोदींनी दुसऱ्याच दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणवर केलेल्या आभार प्रदर्शनात अदानींचे एकदाही नाव न घेता राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली होती. राहुल गांधींनी यानंतर मोदींच्या बोलण्यात सत्यता दिसत होती, असे सांगत त्यांनी माझ्या साध्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, असा आरोप केला होता. 

परंतू, राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरे  न देणाऱ्या सरकारला आता सर्वोच्च न्यायालयात उत्तर द्यावेच लागणार आहे. अदानी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा प्रश्न विचारला आहे. या प्रकरणात गुंतवणूकदारांचे संरक्षण कसे करणार असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला केला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानीच्या शेअर्सची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री सुरू केली. यामध्ये गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले आहेत. यावर न्यायालयाने सरकारला विचारणा केली आहे. 

अधिवक्ता विशाल तिवारी आणि अधिवक्ता एमएल शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून त्यात त्यांनी हिंडेनबर्ग अहवालाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर आज सुनावणी झाली. 

गौतम अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणी याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली आणि कठोर निर्देशही दिले आहेत. अदानी प्रकरणात जे काही युक्तिवाद केले जात आहेत, ते काळजीपूर्वक दिले पाहिजेत, कारण त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होणार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. चौकशी समिती नेमण्याचा विचार करण्याचे संकेतही न्यायालयाने दिले आहेत. आता याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार असून चौकशी समितीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.  

टॅग्स :AdaniअदानीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी