आदिलाबादला विमानतळ!

By Admin | Updated: September 17, 2014 01:37 IST2014-09-17T01:37:58+5:302014-09-17T01:37:58+5:30

देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर-हैदराबाद मार्गावरील आदिलाबाद येथे लवकरच विमानतळ होणार असून, त्यासाठी भारतीय हवाई दलाने मान्यता दिली आहे.

Adalabad airport! | आदिलाबादला विमानतळ!

आदिलाबादला विमानतळ!

बी. संदेश- आदिलाबाद
देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर-हैदराबाद मार्गावरील आदिलाबाद येथे लवकरच विमानतळ होणार असून, त्यासाठी भारतीय हवाई दलाने मान्यता दिली आहे.  
हैदराबाद स्टेटमधील शेवटचा निजाम मिर उस्मान अली खान याने 193क् मध्ये आदिलाबाद शहराच्या मध्यभागी 36क् एकर जागेत तयार केलेल्या एरोड्रमचे भाग्य या निमित्ताने लवकरच उजळणार आहे. या विमानतळाचा रन-वे एक हजार मिटरचा आहे. येथे हवाई वाहतुकीसाठी अनुकूल वातावरण आहे. 
विमानतळाकरिता अतिरिक्त एक हजार 5क्क् एकर जागेसाठी हवाई दलाच्या अधिका:यांनी जिल्हाधिका:यांची भेट घेऊन नुकतीच जागेची पाहणी केली. 
राज्य सरकारतर्फे अधिक 
जागेची पाहणी करून भूमी अधिग्रहणाची प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा महसूल अधिकारी सुधाकर रेड्डी यांनी दिली. 
शहरालगतच्या खानापूर, सातनाला, अनकुंठा, कचकंटी गावातील जमिनी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. निजामशाहीतील या विमानतळाचा उपयोग दुस:या महायुद्धात भारतीय हवाई दलाच्या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी करण्यात आल्याचे जाणकारांनी सांगितले. विशेष असे की, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तेलंगण राज्यातील राजधानी हैदराबाद नंतर दुसरे मोठे विमानतळ आदिलाबाद येथे होणार असल्याने येथे उद्योग व रोजगार संधी उपलब्ध होतील.  
दरम्यान, तेलंगण सरकारच्या उद्योग व वाणिज्य शाखेच्या प्रधान सचिवांसोबत हवाई दलाच्या अधिका:यांनी भेट घेऊन काम लवकरच सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणोनुसार देशात 26 मिनी विमानतळ उभारले जाणार असून, त्यात आदिलाबादला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. 

 

Web Title: Adalabad airport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.