'या' राजकारण्यावर अभिनेत्रीने केला कास्टिंग काऊचचा आरोप
By Admin | Updated: March 14, 2017 17:35 IST2017-03-14T17:35:27+5:302017-03-14T17:35:37+5:30
कास्टिंग काऊचने नेहमीच चित्रपटसृष्टीची काळीबाजू समोर आणली आहे. हिंदीच नव्हे, तामिळ, तेलगु चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो.

'या' राजकारण्यावर अभिनेत्रीने केला कास्टिंग काऊचचा आरोप
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 14 - कास्टिंग काऊचने नेहमीच चित्रपटसृष्टीची काळीबाजू समोर आणली आहे. हिंदीच नव्हे, तामिळ, तेलगु चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो. आता तेलगु चित्रपटातील कस्तुरी या अभिनेत्रीने आघाडीच्या तेलगु अभिनेत्यावर कास्टिंग काऊचचा आरोप केला आहे. निप्पू रावा, अन्नामाया, आकासा विधीलो, मा आयाना बंगाराम या चित्रपटांमध्ये कस्तुरीने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
मुलीच्या नृत्य प्रशिक्षणासाठी जानेवारीपासून भारतात असलेल्या कस्तुरीला याविषयावर बोलते केले तेव्हा ती म्हणाली की, आजही फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी केली जाते. काही अभिनेत्री अशा मागणीला सरळ नकार देतात तर, काही तडजोड करतात. माझ्या प्रकरणात मी करीयरमध्ये उंची गाठू शकले नाही कारण मला काही प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले. त्यासाठी एक हिरो कारणीभूत होता.
तो हिरो आता राजकारणी आहे. त्याला भरपूर अंहकार आहे. मी अजूनही त्याचा आदर करते पण त्याला नकार पचवायला आवडत नाही. मी त्याच्याबरोबर एका चित्रपटात काम केले. आम्ही एकत्र काम करत असताना त्याने मला भरपूर त्रास दिला. त्यानंतर पुढच्या दोन प्रोजेक्टमधून त्याच्यामुळे मला काढून टाकले असे कस्तुरीने सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे, तामिळ अभिनेत्री वरालक्ष्मीनेही दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊंचचा अनुभव आल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते.