थलापती विजय याने राजकारणात प्रवेश केला आहे. काही दिवसापूर्वी पहिलाच राजकारणात कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मोठी गर्दी होती. पण पहिल्याच कार्यक्रमात थलपती विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बाउन्सरांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
तमिलगा वेत्री कझगम (TVK) चे प्रमुख आणि अभिनेता विजय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय यांना जवळून पाहण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बाउन्सर्सनी एका चाहत्यावर हल्ला केला. २०२६ मध्ये होणाऱ्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी मदुराई येथे विजय यांच्या राजकीय रॅलीदरम्यान ही घटना घडली.
व्हिडीओ व्हायरल
२१ ऑगस्टच्या रॅलीच्या व्हिडिओमध्ये, टीव्हीकेचे प्रमुख विजय रॅम्पवरून चालताना दिसत आहेत तर बाजूला लाखो लोक उभे आहेत, हात वर करुन जयजयकार करत आहेत. सात मिनिटांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला, एका माणसाला रॅम्पवरून खाली ढकलले जात असल्याचे दिसत आहे.
विजय थलपती रॅम्पवर चालत असताना, अनेक चाहते राजकारण्याचे स्वागत करण्यासाठी स्टेजवर उड्या मारतात पण बाउन्सर त्यांना बाजूला ढकलतात.
विजय थलापती यांच्यावर आरोप काय?
विजय यांच्या आजूबाजूच्या बाउन्सर्संनी संरक्षण दिले होते. यावेळी एक चाहता जवळ येत होता. बाउन्सरांनी खाली ढकलले. त्या व्यक्तीने मंगळवारी पेरम्बलूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. विजय आणि त्याच्या बाउन्सर्सविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८९(२), २९६(ब) आणि ११५(आय) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बेकायदेशीर जमणे आणि मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा असलेल्या गुन्ह्याला चिथावणी देणे हा समावेश आहे.