शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी आखला होता प्रकाश राज यांना संपवण्याचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 17:46 IST

लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी कट्टर हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली होती

बंगळुरु : अभिनेते प्रकाश राज हे पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या निशाणाऱ्यावर होते, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी प्रकाश राज यांच्या हत्येची संपूर्ण योजना आखली होती, अशी धक्कादायक माहितीदेखील तपासातून समोर आली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सध्या कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीकडून सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित परशुराम वाघमारेनं गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली दिली आहे. याशिवाय या प्रकरणात आणखी काहींना अटक करण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीकडून सध्या परशुराम आणि त्याच्या इतर साथीदारांची चौकशी सुरू आहे. लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी अभिनेते प्रकाश राज यांच्या हत्येचा कट आखल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीतून मिळाली आहे. लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी कडव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी संघटनांवर जोरदार टीका केली होती. याच टीकेमुळे प्रकाश राज यांना संपवण्याचं कारस्थान रचण्यात आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश राज मँगलोरमधील एका खासगी कार्यक्रमात सहभागी होणार होते. याच कार्यक्रमादरम्यान त्यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र या माहितीला एसआयटीनं दुजोरा दिलेला नाही. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींकडून एक वही जप्त करण्यात आली आहे. या वहीत 11 जणांची नावं आहेत. या 11 जणांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहेत.  

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजGauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरण