शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते प्रकाश राज यांनी भाजपाच्या खासदाराला पाठविली कायदेशीर नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 21:21 IST

दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप सिम्हा यांना ट्रोल केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. प्रताप सिम्हा हे मैसूर-कोडागू मतदारसंघाचे खासदार आहेत. 

ठळक मुद्दे ट्रोल केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस प्रताप सिम्हा हे मैसूर-कोडागू मतदारसंघाचे खासदारप्रश्नाचे उत्तर दिले नाही, तर त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई

बंगळुरु : दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप सिम्हा यांना ट्रोल केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. प्रताप सिम्हा हे मैसूर-कोडागू मतदारसंघाचे खासदार आहेत. बंगळुरु येथे मीडियाशी बोलताना अभिनेते प्रकाश राज म्हणाले की, या देशातील नागरिकांना मी फक्त एक प्रश्न विचारला, परंतू मला यावरुन ट्रोल करण्यात आले. त्यामुळे माझ्या व्यक्तीगत आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मी प्रताप सिम्हा यांनी कायदेशीर प्रश्न विचारला आहे. जर त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, तर त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही प्रकाश राज म्हणाले. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात प्रकाश राज यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी सोशल मीडियावर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला होता. यावेळी ते म्हणाले होते, ज्या लोकांनी गौरी लंकेश यांची हत्या केली ते अद्याप पकडले गेले नाही. त्यांना पकडणे, शिक्षा करणे हा वेगळा मुद्दा आहे, मात्र देशात हजारो लोक असे आहे, जे सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा करत आहे. आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहित आहे हे कोण लोक आहेत आणि ते कोणत्या विचारधारेचे आहेत. मृत्यूवर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांपैकी काही असेही आहेत ज्यांना आमचे पंतप्रधान मोदी फॉलो करतात. मला याच गोष्टीची चिंता आहे, आपला देश कोणत्या दिशेने चालला आहे?' पंतप्रधान त्यांच्या फॉलोअर्सच्या प्रतिक्रियांवर मौन बाळगून आहेत. त्यांची चुप्पी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? ते काय माझ्यापेक्षाही मोठे कलाकार होण्याचा प्रयत्न करत आहेत? त्यांचे मौन मला त्रस्त करत आहे. त्यांनी साधलेले मौन हे त्यांच्या फॉलोअर्सना मुक समर्थनाचा प्रयत्न आहे का?'असे प्रकाश राज म्हणाले होते. 

प्रताप सिम्हा यांनी काय केले होते ट्विट ?- खासदार प्रताप सिम्हा यांनी दोन ऑक्टोबरला ट्विट केले होते. त्यामध्ये प्रकाश राज यांच्यावर निशाणा साधत असे म्हटले होते की, आपल्या पत्नीला सोडून एक डान्सरसोबत जाणारा एक व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कोणत्या हक्काने आरोप करत आहे? असा सवाल केला होता.  

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राज