शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

'राम करे प्रणाम...', श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला मंचावर हृदयविकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 14:07 IST

नवरात्रीनिमित्त आयोजित नाटकात भगवान श्रीरामाची भूमिका ठरली अखेरची....

नवी दिल्ली: दिल्लीतील शाहदरा भागातून एक दुःखद घटना समोर आली आहे. येथे नवरात्रीच्या (Navratrri) निमित्ताने रामलीलाचे (Ramleela) आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा मंचावरच हृदयक विकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाली. सुशील कौशिक (वय 45) असे या कलाकाराचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रामलीला सुरू असताना सुशिल कौशिक यांना अचानक अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या, यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. विश्वकर्मा नगरमध्ये राहणारे सुशील व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिमध्ये प्रभू रामाची भूमिका साकारणारे सुशील कौशिक मंचावर आपले संवाद बोलताना दिसत आहेत. या वेळी त्यांना हृदयात वेदना जाणवू लागल्याने ते आपल्या छातीवर हात ठेवतात आणि अचानक स्टेजवरून खाली उतरतात. यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. श्रीरामाचे निस्सीम भक्त असलेल्या सुशील यांच्या अचानक जाण्याने विश्वकर्मा नगरमधील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

यापूर्वी अशीच घटना घडलेली

नाटकात कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जूनच्या सुरुवातीला एका नाटकात सैनिकाची भूमिका साकरणाऱ्या व्यक्तीचाही मंचावर मृत्यू झाला होता. उपस्थितांना वाटले की, कलाकार अभिनय करतोय, पण त्यांचा जीव गेला होता. बलविंदर सिंग छाबरा असे या व्यक्तीचे नाव होते. बराचवेळ बलविंदर सिंग उठले नाही, त्यानंतर सर्वांना त्यांच्या मृत्यूची बाब समजली. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाdelhiदिल्लीDeathमृत्यूSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल