शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

मनी लाँड्रिंग: अभिनेत्री लीना पॉलचा सहभाग; ईडीचा दावा, कोठडीत २३ ऑक्टोबरपर्यंत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 06:00 IST

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग घोटाळा करण्यात सुकेश चंद्रशेखर याच्याइतकाच त्याची पत्नी व अभिनेत्री लीना मरिया पॉल हिचाही सक्रिय सहभाग होता, असा ईडीचा दावा आहे.

नवी दिल्ली : २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग घोटाळा करण्यात सुकेश चंद्रशेखर याच्याइतकाच त्याची पत्नी व अभिनेत्री लीना मरिया पॉल हिचाही सक्रिय सहभाग होता, असा ईडीचा दावा आहे. लीना हिच्या कोठडीत न्यायालयाने २३ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.लाँड्रिंग प्रकरण घोटाळा करण्यात सुकेश चंद्रशेखरसोबत लीनाचाही सहभाग आहे. तिने दिलेल्या सूचनांप्रमाणेच पैशांचे व्यवहार करण्यात आले. त्या व्यवहारांची चौकशी अद्याप पूर्ण व्हायची आहे. लीनाला दिलेल्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून मिळाली नसती तर ही चौकशी अपूर्ण राहिली असती. फोर्टिस हेल्थ केअरचे प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांना सुकेश चंद्रशेखर व लीना मरिया पॉल यांनी २०० कोटी रुपयांना फसविले आहे. शिविंदर मोहन सिंग यांना जामीन मिळवून देतो, असे सांगत सुकेश चंद्रशेखर याने अदिती सिंग यांची आर्थिक फसवणूक केली. शिविंदर मोहन सिंग यांना २०१९ साली रेलिगेअर फिनव्हेस्टमध्ये झालेला आर्थिक घोटाळा व मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आली होती.  लीना मरिया पॉल हिने याआधी मद्रास कॅॅफेसारख्या काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. लीनाच्या नेल आर्टिस्ट्री या कंपनीने चेन्नईमध्ये ४.७९ कोटी, कोचीमध्ये १.२१ कोटीचा व्यवसाय केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते. मात्र, हा मनी लाँड्रिंगमधील पैसा आहे, असा ईडीचा दावा आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी लीनाच्या मोबाईलमधील सर्व माहिती ईडीने मिळविली आहे. (वृत्तसंस्था)२०० कोटीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात माझी फसवणूक झाली आहे. मी या गुन्ह्यात गुंतलेली नाही, असे बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने सांगितले. तिने एका निवेदनात म्हटले आहे की, मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या निमित्ताने अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे मी हे स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणाची मला जी माहिती आहे, ती एक साक्षीदार म्हणून मी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.  नोरा फतेहीने काही दिवसांपूर्वी ईडीच्या दिल्ली कार्यालयात उपस्थित राहून मनी लाँड्रिंग प्रकरणाविषयी तिच्याकडील माहिती दिली होती. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला उद्या, सोमवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय