शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
2
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
3
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
4
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
5
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
6
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
7
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
8
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
9
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
10
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
11
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
12
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
13
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
14
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
15
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
16
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
18
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
19
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
20
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती

तो अभिनेता म्हणाला, 'सबरीमाला मंदिरात येणा-या महिलांचे दोन तुकडे करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 5:00 PM

सबरीमाला मंदिराचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयानं महिलांसाठी खुले केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर काहींनी टीका केलीय.

नवी दिल्ली- सबरीमाला मंदिराचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयानं महिलांसाठी खुले केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर काहींनी टीका केलीय. त्यात आता एका अभिनेत्यानं महिलांच्या मंदिर प्रवेशावर वादग्रस्त विधान केलं आहे. मलयालम या चित्रपटातील अभिनेता कोल्लम थुलासी याच्या वादग्रस्त विधानानं एकच खळबळ उडाली आहे. थुलासीच्या मते, सबरीमाला मंदिरात येणा-या महिलांचे दोन तुकडे केले पाहिजेत. त्या महिलेचा एक भाग दिल्लीत पाठवला पाहिजे, तर दुसरा भाग तिरुअनंपूरममधल्या मुख्यमंत्री कार्यालयात फेकून दिला पाहिजे.गेल्या काही दिवसांपूर्वीच सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधनं घातली जातायत. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाहीत, असंही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी सांगितलं होतं. तसेच 10-50 वयोगटातील महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखल्यास ते संवैधानिक तत्त्वांचे उल्लंघन करणारे ठरेल. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी स्त्री व पुरुषावरून भेदभाव करणं योग्य नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं.का होती मंदिरात प्रवेशबंदी? केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे. 

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिर