नवी दिल्ली- सबरीमाला मंदिराचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयानं महिलांसाठी खुले केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर काहींनी टीका केलीय. त्यात आता एका अभिनेत्यानं महिलांच्या मंदिर प्रवेशावर वादग्रस्त विधान केलं आहे. मलयालम या चित्रपटातील अभिनेता कोल्लम थुलासी याच्या वादग्रस्त विधानानं एकच खळबळ उडाली आहे. थुलासीच्या मते, सबरीमाला मंदिरात येणा-या महिलांचे दोन तुकडे केले पाहिजेत. त्या महिलेचा एक भाग दिल्लीत पाठवला पाहिजे, तर दुसरा भाग तिरुअनंपूरममधल्या मुख्यमंत्री कार्यालयात फेकून दिला पाहिजे.गेल्या काही दिवसांपूर्वीच सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधनं घातली जातायत. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाहीत, असंही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी सांगितलं होतं. तसेच 10-50 वयोगटातील महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखल्यास ते संवैधानिक तत्त्वांचे उल्लंघन करणारे ठरेल. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी स्त्री व पुरुषावरून भेदभाव करणं योग्य नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं.
तो अभिनेता म्हणाला, 'सबरीमाला मंदिरात येणा-या महिलांचे दोन तुकडे करा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 17:00 IST