अभिनेता आर्यन वेदने घातली पोलिसांशी हुज्जत आर्यन-पोलीस शिपायाविरोधात एनसी
By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:40+5:302015-06-02T00:03:40+5:30
अभिनेता आर्यन वेदने घातली पोलिसांशी हुज्जत

अभिनेता आर्यन वेदने घातली पोलिसांशी हुज्जत आर्यन-पोलीस शिपायाविरोधात एनसी
अ िनेता आर्यन वेदने घातली पोलिसांशी हुज्जतआर्यन-पोलीस शिपायाविरोधात एनसीमुंबई । दि. १ (प्रतिनिधी) ............................................मॉडेल, अभिनेता आर्यन वेद याने काल जुहू परिसरात वाहतूक पोलीस शिपायाशी हुज्जत घातली. दोघांमधील वाद ब्रेथॲनलायझर यंत्रावरून घडला. या प्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. त्यावरून दोघांविरोधात एनसी नोंद करण्यात आली.जुहूच्या १०व्या रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास नाकाबंदीत आर्यनची कार पोलिसांनी अडवली. तो दारूच्या नशेत कार चालवत असल्याचा संशय पोलीस शिपाई सतीश म्हात्रे यांना होता. म्हात्रे यांनी ब्रेथॲनलायझर यंत्र आर्यनसमोर धरले आणि त्यात श्वास सोडण्यास सांगितले. मात्र आर्यनने त्यास नकार दिला. आर्यनने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ते यंत्र वरकरणी अनेक दारूडया चालकांनी वापरलेले वाटत होते. ते वापरण्यास मला किळस वाटला. त्यामुळे मी नवे यंत्र आणा, अशी मागणी केली. मात्र पोलीस शिपायाने त्यावरून माझ्याशी हुज्जत घातली. मला शिवीगाळ केली. नंतर मी जुहू पोलीस ठाणे गाठले. तेथे नवे यंत्र मला देण्यात आले. मी दारू प्यायलो नव्हतो हे स्पष्ट झाले. दरम्यान चाचणीनंतर आर्यनने म्हात्रेंविरोधात तक्रार दिली. तर म्हात्रे यांनीही सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार आर्यनविरोधात दिली. दोघांविरोधा एनसी दाखल करण्यात आल्याची माहिती वाहतूक दलाचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. वाहतूक पोलिसांकडील ब्रेथॲनलायझर यंत्रे स्वच्छ आणि सुरक्षित आहेत. जर आर्यनला यंत्राबाबत संकोच होता तर त्याने तेथे उपस्थित वरिष्ठ अधिकार्यांना तसे सांगायला हवे होते. शिवाय जर तो दारू प्यायला नव्हता तर त्याने इतका गोंधळ घालण्याची काहीच आवश्यकता नव्हती, असेही भारंबे यांनी सांगितले.