शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

हिंदू कट्टरपंथीय दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय- कमल हासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 13:14 IST

अभिनय क्षेत्रानंतर राजकारणात प्रवेश करण्याच्या मार्गावर असणारे अभिनेते कमल हासन यांनी एका साप्ताहिकात लेख लिहिला आहे.

ठळक मुद्देअभिनय क्षेत्रानंतर राजकारणात प्रवेश करण्याच्या मार्गावर असणारे अभिनेते कमल हासन यांनी एका साप्ताहिकात लेख लिहिला आहे.  'हिंदू दहशतवादा'वर भाष्य करणारा लेख लिहून कमल हासन यांनी खळबळ उडवून दिली आहे.

नवी दिल्ली- अभिनय क्षेत्रानंतर राजकारणात प्रवेश करण्याच्या मार्गावर असणारे अभिनेते कमल हासन यांनी एका साप्ताहिकात लेख लिहिला आहे.  हिंदू दहशतवादावर भाष्य करणारा लेख लिहून कमल हासन यांनी खळबळ उडवून दिली आहे. 'उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे', असा आरोप कमल हासन यांनी त्यांच्या लेखातून केला आहे.

तामिळ भाषेतील 'आनंदा विकटन' या साप्ताहिकात कमल हासन यांनी हा लेख लिहिला आहे. 'हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, असं कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्ववादी चर्चा करण्यावर विश्वास ठेवायचे. पण आता ते हिंसाचारातही सहभागी होऊ लागले आहेत', असं कमल हासन यांनी म्हंटलं आहे. तसंच जनतेचा 'सत्यमेव जयते'वरील विश्वास उडाला आहे, असंही त्यांनी लेखात म्हंटलं आहे. 'तामिळनाडूच्या तुलनेत केरळ सरकारने धार्मिक हिंसाचार चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे', असं म्हणत कमल हासन त्यांनी केरळ सरकारचं कौतुकही केलं आहे.

कमल हासन यांच्या या लेखावर तामिळनाडूत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही कमल हासन यांच्या या लेखावर कडक शब्दात टीका केली आहे. 'कमल हासन हे नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत. हिंदू दहशतवादा'चा कोणताही पुरावा नाही,' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे नेते मुरलीधरन यांनी कमल हासन यांच्या लेखावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कमल हासन हे सत्यापासून तोंड फिरवत असल्याचं त्यांनी म्हंटलं. केरळमधील खरी परिस्थिती वेगळं असल्याचं त्यांनी म्हंटलं.