शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्वबदलाबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई? मिळताहेत असे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 20:57 IST

नेतृत्वबदलावरून काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद अखेर आज सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपुष्टात आला आहे.

नवी दिल्ली - गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून सुरू असलेला वाद अखेर आज सोनिया गांधी यांची पुन्हा हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काहीसा निवळला आहे. मात्र नेतृत्वबदलावरून सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. सोनिया गांधीना पत्र लिहिणाऱ्या या नेत्यांवर पक्षाच्या घटनेनुसार कारवाई होणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्या अंबिका सोनी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सांगितल्याचे एएनआयने सूत्र्यांच्या हवाल्याने सांगितले आहे.दरम्यान, गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी सांगितले की आम्ही मर्यादेत राहून प्रश्न उपस्थित केले आहेत. असे असूनही जर कुणाला हा शिस्तभंग वाटत असेत तर त्यांनी आमच्यावर कारवाई करावी. संघटनेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आमचे काही प्रश्न होते. त्यावर लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही पत्र लिहिले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.आज झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधींकडेच पक्षाचे हंगामी अध्यक्षपद कायम ठेवावे, असा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती कार्यकारी समितीचे सदस्य के.एच मणियप्पा यांनी सांगितले की, सोनिया गांधींना हंगामी अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय एकमताने घण्यात आला आहे. पक्षामध्ये नेतृत्वाबाबत कुठलेही मतभेद नाही आहेत. तसेच गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक आणि आनंद शर्मा यांनीही नेतृत्वाबाबत कुठलाही वाद नाही, असे लिहून दिले आहे. तर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठीची पुढील बैठक ही पुढच्या सहा महिन्यांत होईल, असे पी.एल. पुनिया यांनी सांगितले.राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाम, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, अकउउ आणि उहउ चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद, माजी मुख्‍यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, वीरप्‍पा मोइली, पृथ्‍वीराज चव्‍हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी आणि मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष सांभाळण्याचा अनुभव असलेले राज बब्‍बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह यांच्यासह अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्‍त्री आणि संदीप दीक्षित यांनी नेतृत्वबदलाबाबत पत्र लिहिले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीPoliticsराजकारण