अडीच हजार विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

By Admin | Updated: February 3, 2016 00:28 IST2016-02-03T00:28:54+5:302016-02-03T00:28:54+5:30

दुसरा दिवस : अडीच लाख रुपये दंड वसूल

Action on two and a half thousand Vinhelmat bikers | अडीच हजार विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

अडीच हजार विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

सरा दिवस : अडीच लाख रुपये दंड वसूल
औरंगाबाद : शहरात सोमवारपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी पाच हजारांवर दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली होती. दुसर्‍या दिवशी पोलिसांचा ताफा पॉइंट बदलून रस्त्यावर कायम होता. मंगळवारी २ हजार ३८६ दुचाकीस्वारांकडून २ लाख ३८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
दुसर्‍या दिवशी दंड ठोठाविण्यात आलेल्या वाहनचालकांची संख्या कमी होऊन हेल्मेटधारकांची संख्या वाढली, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी दिली. संपूर्ण वाहतूक शाखा, सर्व ठाण्यांचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक, असा मोठा पोलीस फौजफाटा रस्त्यावर उतरून कारवाई करीत होता. मुख्य चौकात पोलीस अडवून कारवाई करतात हे लक्षात आल्यामुळे दुचाकीस्वारांनी गल्ली-बोळांमधील रस्त्यावरून गाड्या दामटल्या.
ग्रामीण पोलिसांनीही हेल्मेट नसणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दुसर्‍या दिवशी ग्रामीण भागात ४३८ दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४३ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
(चौकट)
वृत्तपत्र विक्रेत्यांना सूट द्यावी
वृत्तपत्र वाटपाचे काम हे सकाळी ९ वाजेच्या आत पूर्ण होते. विशेष म्हणजे यावेळी रस्त्यावर गर्दीही नसते. तसेच वृत्तपत्र वाटप करण्यासाठी प्रत्येक बिल्डिंगपुढे थांबावे लागते. वृत्तपत्र टाकण्याचे काम करून हेल्मेट सांभाळणे शक्य होत नाही. हेल्मेट घालून वृत्तपत्र वाटप करणेही सोईस्कर होणार नाही. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना हेल्मेट सक्तीतून सूट द्यावी, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जगताप, उपाध्यक्ष शेख फहीम, सचिव नीलेश फाटके आणि कोषाध्यक्ष गणेश भोसले यांनी केली आहे. या संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांनाही निवेदन देण्यात येणार आहे. पुणे, मुंबईत हेल्मेट सक्ती असली तरी वृत्तपत्र विक्रेत्यांना सूट देण्यात आल्याचेही या संघटनेने सांगितले.
(जोड आहे)

Web Title: Action on two and a half thousand Vinhelmat bikers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.