शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

यूपीतल्या आयपीएस दर्जाच्या अधिका-यानं राम मंदिर बनवण्याची घेतली शपथ, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 16:45 IST

उत्तर प्रदेशमधले डीजी होमगार्ड सूर्यकुमार शुक्ला यांनी राममंदिर निर्माणाचा भर मंचावर संकल्प केला आहे. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

लखनऊः उत्तर प्रदेशमधले डीजी होमगार्ड सूर्यकुमार शुक्ला यांनी राममंदिर निर्माणाचा भर मंचावर संकल्प केला आहे. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. गुरुवारी लखनऊमध्ये आयोजित केलेल्या सभेत त्यांनी राम मंदिर निर्माणाची शपथ घेतली. त्यासंदर्भातील त्यांच्या सभेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओवर जोरदार आक्षेप घेत काँग्रेसनं योगी सरकारकडे डीजी होमगार्ड यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यानं डीजी सार्वजनिक वाच्यता करू शकतात, असंही वकील केटीएस तुलसी म्हणाले आहेत.विरोधकांनी डीजींच्या विधानाला जोरदार आक्षेप घेत विरोध प्रदर्शनही केलं आहे. त्यामुळे योगी सरकारनंही डीजी होमगार्ड सूर्यकुमार शुक्ला यांच्याकडून खुलासा मागवला आहे. त्यानंतर डीजीनंही या प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे फोनवरून स्पष्टीकरण दिलं आहे. डीजी म्हणाले, कार्यक्रमाला जाण्यापूर्वी मी अशी कोणतीही शपथ घेईन, असं ठरवलं नव्हतं. मी फक्त कार्यक्रमाचा एक भाग होण्यासाठी गेलो होतो. मी कोणतंही भाषण दिलं नाही किंवा कोणतीही वादग्रस्त विधानं केली नाहीत. तर डीजींबरोबर इतरही काही मुस्लिम नेत्यांनी राम मंदिर निर्माणाची शपथ घेतली आहे. हा कार्यक्रम 28 जानेवारी 2018 रोजी लखनऊ विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राममंदिर आणि हिंदूसंबंधित अनेक गोष्टींवर चर्चा करण्यात आली.या कार्यक्रमाच्या मंचावर खुद्द डीजी होमगार्ड सूर्यकुमार उपस्थित होते. डीजीपीच्या शर्यतीत असलेले सूर्यकुमार शुक्ला हे 1982 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. डीजीच्या पदावर असतानाही राम मंदिर बनवण्याची शपथ घेणं हे सरकारी सेवेच्या विरुद्ध आहे. तसेच डीजी असताना कोणत्याही सामाजिक किंवा राजनैतिक मुद्द्यावर व्यक्त होणं योग्य नसल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे. त्यामुळे डीजींच्या या विधानानं योगी सरकार पुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश