लग्नात डी.जे.वाजविला तर कारवाई
By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:59+5:302016-02-01T00:03:59+5:30
फोटो

लग्नात डी.जे.वाजविला तर कारवाई
फ टोजळगाव: सर्वोच्च न्यायालयाने डी.जे.वाद्यावर बंदी घातली आहे, तरीही लग्न समारंभात डी.जे.चा वापर होत असल्याच्या तक्रारी येवू लागल्या आहेत. लग्नात अथवा कोणत्याही कार्यक्रमात डी.जे.वाजविला तर मालकासह मंगल कार्यालय व्यवस्थापक व आयोजकावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी दिला आहे. रविवारी सकाळी रामानंद नगर पोलीस स्टेशनला डी.जे.चालक, मंगल कार्यालय व बॅँडमालकांची बैठक घेण्यात आली. सध्या लग्न सराई सुरु झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंगल कार्यालय मालकांनी सभागृह व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, सुरक्षा रक्षक नेमावेत, पार्कींगसाठी स्वतंत्र सुविधा करावी, वाद्य वाजविण्याबाबत पोलीस स्टेशनची पुर्व परवानगी घेतल्याशिवाय सभागृह ताब्यात देवू नये आदी सूचनांचे पालन करणे आवश्यक असून त्याची अमलबजावणी झाली नाही तर मंगल कार्यालयाची नोंदणी रद्द करण्यासह बॅँड चालक व आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा वाडीले यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना शांतता क्षेत्रात वाद्य, वाजंत्री वाजविल्यास वाद्य सामुग्री जप्त करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. कोणत्याही मंगल कार्यालयात रात्री दहा वाजेनंतर वाद्य वाजता कामा नये तसेच ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे पालक करावे, अशा सूचनाही वाडीले यांनी यावेळी दिल्या. शहरातील विविध रुग्णालय,शाळा, महाविद्यालय शासकीय कार्यालय आदी परिसर मनपाच्यावतीने शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत याची जाणीव यावेळी करुन देण्यात आली. बैठकीला सहायक निरीक्षक मनजितसिंग चव्हाण, उपनिरीक्षक दिलीप पाटील, गुन्हे शाखेचे प्रदीप चौधरी, शरद पाटील, राजेश पाटील व कर्मचारी उपस्थित होते.