शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 09:29 IST

कोविड महामारीदरम्यान डॉ. मनोज आपत्कालीन विभागात रुग्णांच्या उपचारात व्यग्र असताना आमदार आले.  डॉक्टर खुर्चीतून उठले नाहीत म्हणून आमदारांनी आक्षेप घेतला.

डॉ. खुशालचंद बाहेती नवी दिल्ली - आमदार आल्यानंतर उभे राहिले नाहीत म्हणून सरकारी डॉक्टरांवर  कारवाई केल्याबद्दल पंजाब व हरयाणा हायकोर्टाने हरयाणा सरकारची खरडपट्टी काढली आहे व  सरकारला ५० हजार दंड केला आहे. 

कोविड महामारीदरम्यान डॉ. मनोज आपत्कालीन विभागात रुग्णांच्या उपचारात व्यग्र असताना आमदार आले.  डॉक्टर खुर्चीतून उठले नाहीत म्हणून आमदारांनी आक्षेप घेतला. प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली. डॉक्टरांनी आमदारांना ओळखले नाही आणि न उभे राहण्यामागे कुठलाही जाणीवपूर्वक अनादर नव्हता असा खुलासाही दिला. मात्र, प्रशासनाने नोटीस व कारवाई प्रलंबित ठेवली. २०२४ मध्ये डॉ. मनोजना पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. त्यांनी प्रवेशासाठी आवश्यक असलेले रुग्णालयाचे नाहरकत प्रमाणपत्र मागितले. मात्र,  शिस्तभंग कारवाई प्रलंबित आहे म्हणत नाहरकत प्रमाणपत्र नाकारण्यात आले. डॉक्टरांनी हायकोर्टात याला आव्हान दिले. कोर्टाने राज्याच्या भूमिकेवर तीव्र टीका करत दंड ठोठावला.

कोविड काळात कर्मचाऱ्यांनी ज्या परिस्थितीत काम केले याचे कौतुक  करण्याऐवजी डॉक्टरांवर कारवाई केली. जनप्रतिनिधींचे सरकारी कर्मचाऱ्यांसोबत होणाऱ्या गैरवर्तणुकीची प्रकरणे वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. अत्यावश्यक सेवा बजावणारे प्रचंड ताणाखाली काम करतात, त्यांना आदराने वागवणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी आमदार, खासदारांसाठी उठून उभे राहण्याची अपेक्षा अवास्तव आहे - न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा व न्यायमूर्ती रोहित कपूर. 

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor Penalized for Not Standing for MLA; High Court Reprimands Government

Web Summary : Haryana government fined for penalizing a doctor who didn't stand for an MLA during COVID duty. The High Court criticized the action, emphasizing respect for essential workers under stress and calling expectations of standing for politicians unrealistic.
टॅग्स :Courtन्यायालय