सहाय्यक आयुक्तांवर कारवाईची टांगती तलवार
By Admin | Updated: August 1, 2015 00:19 IST2015-08-01T00:19:01+5:302015-08-01T00:19:01+5:30
वसुलीची जबाबदारी : अध्यक्षांनी दिला कारवाईचा इशारा

सहाय्यक आयुक्तांवर कारवाईची टांगती तलवार
व ुलीची जबाबदारी : अध्यक्षांनी दिला कारवाईचा इशारानागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विकास कामासाठी पैसा नसल्याने नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे गेल्या तीन दिवसापासून झोननिहाय मालमत्ता कराच्या वसुलीचा आढावा घेत आहे. शुक्रवारी आशीनगर व मंडळवारी झोनच्या आढावा बैठकीत वसुलीचे उद्दीष्ट न गाठल्यास कर निरीक्षक व झोनच्या सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.आशीनगर झोनची वसुली सर्वात कमी आहे. बहुसंख्य नागरिकांना मालमत्ता करात पाण्याचे बील जोडून पाठविण्यात आले आहे. पाण्याची देयके स्वतंत्र दिली जात असताना मालमत्ता करातही याचा समावेश असल्याने वसुलीवर परिणाम झाला आहे. यात सुधारणा करून १५ दिवसात नवीन देयके पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सर्व मालमत्ताधारकांना देयके पाठविण्यात आलेली नाही. याचाही वसुलीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात नोंद क रण्यात येईल. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. आशीनगर व मंगळवारी झोनच्या बैठकीला कर व कर आकारणी समितीचे सभापती गिरीश देशमुख, झोन सभापती इशरत नाहीद, राजू थूल, सरस्वती सलामे, मुरली मेश्राम, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहाय्यक आयुक्त अशोक पाटील, विजय हुमने यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)