चित्रविचित्र नंबरप्लेट बनविल्यास दुकानदारांवर कारवाई बैठक : पोलीस अधीक्षकांनी दिला इशारा
By Admin | Updated: July 29, 2016 23:39 IST2016-07-29T23:39:27+5:302016-07-29T23:39:27+5:30
जळगाव : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेट या प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसारच तयार केल्या पाहिजेत. यापुढे चित्रविचित्र पद्धतीने नंबरप्लेट बनविणार्या रेडिअम आर्टच्या दुकानदारांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिला.

चित्रविचित्र नंबरप्लेट बनविल्यास दुकानदारांवर कारवाई बैठक : पोलीस अधीक्षकांनी दिला इशारा
ज गाव : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेट या प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसारच तयार केल्या पाहिजेत. यापुढे चित्रविचित्र पद्धतीने नंबरप्लेट बनविणार्या रेडिअम आर्टच्या दुकानदारांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिला.शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात शुक्रवारी पोलीस अधीक्षकांनी शहरातील रेडिअम आर्ट दुकानदारांची बैठक घेतली. या बैठकीला २० दुकानदार उपस्थित होते. या बैठकीत डॉ.जालिंदर सुपेकर यांनी महत्त्वपूर्ण सूचना दुकानदारांना केल्या. या वेळी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची उपस्थिती होती.२१० वाहनांवर कारवाईशुक्रवारी शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या १६० तर चित्रविचित्र नंबरप्लेट असलेल्या ५० अशा एकूण २१० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्या २० हातगाडीधारकांवरही कारवाई करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.