संपत्ती कर न भरणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: January 30, 2015 00:54 IST2015-01-30T00:54:14+5:302015-01-30T00:54:14+5:30

संपत्ती कर न भरणाऱ्यांवर कारवाई
> संपत्ती कर न भरणाऱ्यांवर कारवाई नागपूर : महानगरपालिकेच्या आसीनगर झोन अंतर्गत संपत्ती कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत चार घरांना टाळे ठोकण्यात आले. वॉर्ड क्रमांक ४३, ५७ येथील कृष्णलाल भोजराज साहानी व अजय कुमार साहनी यांच्या घरावर एकूण १८ हजार ७५ रुपये थकीत होते. सतनामसिंग यांच्या घरावर २६ हजार ५७३ रुपये थकीत होते. जसवंतसिंग यांच्या घरावर २६ हजार ५९८ रुपये आणि आरमोर डेव्हलपर्स यांच्या घरावर ४ लाख १६ हजार ४१२ रुपये संपत्ती कर थकीत होते. ही कारवाई झोनमधील कर व कर वसुली शाखेचे कर निरीक्षक अतुल माटे, संजय कांबळे, महेंद्र कांबळे, सतीश बर्लेवार, सुनील मेश्राम आिणि दीपक जांभुळकर यांनी केली.