मडगाव : कैद्याचा गणवेश घालण्यास नकार दिल्याने नुवेचे आमदार मिकी पाशेको यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तुरुंगाचे नियम न पाळून बेशिस्त वागल्यामुळे पाशेकोंना आता लोकांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. वास्कोचे तुरुंग निरीक्षक गौरीश शंखवाळकर यांनी दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांना पाठविलेल्या अहवालात या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पाशेको आता कैद्याचा गणवेश वापरू लागले आहेत, हेही त्यांनी नमूद केले आहे. पाशेको कैद्याचा गणवेश वापरत नाहीत, अशा आशयाची तक्रार अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी न्या. सरदेसाई यांच्याकडे केल्यावर त्यांनी तुरुंगाधिकाऱ्यांकडून यासंबंधीचा अहवाल मागितला होता.
तुरुंगाचे नियम न पाळणाऱ्या आमदारावर कारवाई
By admin | Updated: June 25, 2015 01:17 IST