एलटीसीचा गैरवापर केल्यास कारवाई
By Admin | Updated: February 14, 2017 00:46 IST2017-02-14T00:46:28+5:302017-02-14T00:46:28+5:30
केंद्र सरकारचे कर्मचारी रजा प्रवास सवलतीचा (एलटीसी) गैरवापर करीत असल्याचे आढळून आले असून त्यांच्यावर आता शिस्तभंगाची कारवाई होईल

एलटीसीचा गैरवापर केल्यास कारवाई
नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कर्मचारी रजा प्रवास सवलतीचा (एलटीसी) गैरवापर करीत असल्याचे आढळून आले असून त्यांच्यावर आता शिस्तभंगाची कारवाई होईल, असा इशारा कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) दिला आहे.
एलटीसीची सवलत उपभोगताना कर्मचाऱ्याला प्रवासाचे येण्या-जाण्याचे भाडे व रजा दिली जाते. डीओपीटीने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्मचाऱ्यांना यापुढे त्याने व त्याच्या कुटुंबियांनी अर्जात नमूद केलेल्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट दिली आहे, असे निवेदन द्यावे लागेल.