धरमपेठेतील हुक्का पार्लरवर कारवाई

By Admin | Updated: December 6, 2015 02:07 IST2015-12-06T02:07:15+5:302015-12-06T02:07:15+5:30

नागपूर : धरमपेठेतील वैभव मिश्राच्या हुक्का पार्लरवर सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री छापा घातला. येथे तरुण-तरुणी हुक्का पितांना आढळल्याने पोलिसांनी त्याच्यावर चलान कारवाई केली.

Action on the Hukka Parlor in Dharampeth | धरमपेठेतील हुक्का पार्लरवर कारवाई

धरमपेठेतील हुक्का पार्लरवर कारवाई

गपूर : धरमपेठेतील वैभव मिश्राच्या हुक्का पार्लरवर सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री छापा घातला. येथे तरुण-तरुणी हुक्का पितांना आढळल्याने पोलिसांनी त्याच्यावर चलान कारवाई केली.
शहरात अनेक ठिकाणी बिनबोभाट हुक्का पार्लर सुरू आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या या हुक्का पार्लरवर अक्षरश: उड्या पडत असून, रात्र होताच या हुक्का पार्लरमधील तरुण-तरुणींची वर्दळ वाढते. पहाटेपर्यंत तेथे नुसता गोंधळ असतो. फ्लेवरच्या नावाखाली हुक्क्यामध्ये वेगवेगळे ड्रग देऊन तरुणाईकडून मोठी रक्कम उकळली जाते. धरमपेठेतील एका हुक्का पार्लरमध्ये अशाच प्रकारे तरुण तरुणी हुक्का पीत असल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांना कळली. त्यामुळे पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. के. मुंढे यांनी आपल्या पथकासह शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ला तेथे छापा घातला. या हुक्का पार्लरमध्ये दोन तरुणी आणि १० ते १२ तरुण हुक्का पीत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी हुक्का पार्लरचा संचालक वैभव मिश्रा याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यानुसार चलान कारवाई केली. पार्लरमधील साहित्यही जप्त करण्यात आले.
---

Web Title: Action on the Hukka Parlor in Dharampeth