एपीएमसीतील अतिक्रमणांवर कारवाई

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:35+5:302015-08-19T22:27:35+5:30

नवी मंुबई : एपीएमसी परिसरातील व्यापार्‍यांनी विविध प्रकारे केलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेने आज धडक कारवाई केली. या परिसरातील अनेक व्यापार्‍यांनी मार्जिनल स्पेससह गाळ्याच्या अंतर्गत भागात विनापरवाना बदल करून अतिरिक्त बांधकाम केल्याचे दिसून आले आहे. या अतिक्रमणांना महापालिकेने वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. मात्र संबंधितांकडून त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अतिक्रमण विरोधी पथकाने आज धडक कारवाई केली.

Action on encroachment of APMC | एपीएमसीतील अतिक्रमणांवर कारवाई

एपीएमसीतील अतिक्रमणांवर कारवाई

ी मंुबई : एपीएमसी परिसरातील व्यापार्‍यांनी विविध प्रकारे केलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेने आज धडक कारवाई केली. या परिसरातील अनेक व्यापार्‍यांनी मार्जिनल स्पेससह गाळ्याच्या अंतर्गत भागात विनापरवाना बदल करून अतिरिक्त बांधकाम केल्याचे दिसून आले आहे. या अतिक्रमणांना महापालिकेने वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. मात्र संबंधितांकडून त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अतिक्रमण विरोधी पथकाने आज धडक कारवाई केली.
महापालिकेने अतिक्रमण व बेकायदा बांधकामांचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. संबंधित विभाग कार्यालयांना सक्त निर्देश देण्यात आले आहेत. अतिक्रमणे वाढू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आल्या आहे. त्यानुसार महापालिकेच्या वतीने कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. आज एपीएमसी परिसरातील पाच व्यापारी गाळ्यांतील अतिक्रमण हटवण्यात आले. यात एका हॉटेलचाही समावेश आहे. येत्या काळात अतिक्रमणा विरोधातील ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे, त्यामुळे कोणीही बेकायदा बांधकामे किंवा कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये, असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुभाष इंगळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Action on encroachment of APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.