शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:45 IST

भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवले आहे. पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. दरम्यान, भारताने पाकिस्तानी विमानांवर भारतीय हवाई हद्दील प्रवेश नाकारला होता. अजूनही पाकिस्तानी विमानांसासाठी भारताने हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद केले. दुसरीकडे, पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद केले.

'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले

हवाई क्षेत्र बंद करण्यासाठी दोन्ही देशांनी एअरमेनना स्वतंत्र नोटीस जारी केली आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला होता, भारताने ३० एप्रिलपासून आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. यामध्ये पाकिस्तानी विमान कंपन्या आणि ऑपरेटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या, मालकीच्या किंवा भाड्याने घेतलेल्या विमानांचा समावेश आहे, यामध्ये लष्करी उड्डाणांचा देखील समावेश  आहे.

दोन्ही देशांनी हवाई क्षेत्र बंद ठेवले

दोन्ही देशांनी बंदी वाढवली आहे. २२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या NOTAM नुसार, पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत विमाने आणि पाकिस्तानी एअरलाइन्स/ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या/मालकीच्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांसाठी, यामध्ये लष्करी उड्डाणांचा समावेश आहे, भारतीय हवाई क्षेत्र उपलब्ध राहणार नाही. २३ सप्टेंबर रोजी २३५९ तास पासून २४ सप्टेंबर रोजी ०५.३० तासपर्यंत हवाई क्षेत्र बंद राहणार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या विविध उपाययोजनांचा भाग म्हणून ही बंदी सुरुवातीला २४ मे पर्यंत होती. त्यानंतर दर महिन्याला ती वाढवण्यात आली.

पाकिस्ताननेही NOTAM जारी केला 

२४ ऑगस्टपर्यंत लागू असलेले हे निर्बंध आता २४ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आले आहेत. पाकिस्तानने २० ऑगस्ट रोजी NOTAM जारी करून भारतीय विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा कालावधी वाढवला. NOTAM ही एक अधिसूचना असते. यामध्ये उड्डाण ऑपरेशन्समध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेली माहिती असते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानairplaneविमानIndiaभारत