अभिनेत्री उर्वशी रौटेलावर कारवाई
By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:58+5:302015-08-26T00:18:58+5:30
अभिनेत्री उर्वशी रौटेलावर कारवाई

अभिनेत्री उर्वशी रौटेलावर कारवाई
अ िनेत्री उर्वशी रौटेलावर कारवाई मुंबई - मॉडेल, अभिनेत्री उर्वशी रौटेला हिच्याविरोधात मंगळवारी कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनीटने कारवाई केली. एका दिवसाच्या दुबईवारीला गेलेल्या उर्वशीने सोबत सुमारे ११ लाखांच्या वस्तू आणल्या होत्या. त्यात ८ लाखांच्या दागिन्यांचाही सहभाग होता. या वस्तू कर भरल्याशिवाय उर्वशीने विमानतळाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिला एआययू अधिकार्यांनी अडवले. २० लाखांपेक्षा कमी किंमतीच्या वस्तू असतील तर अटकेची कारवाई केली जात नाही, अशी माहिती एआययूने दिली. गेल्या चार महिन्यात उर्वशीने अनेकदा दुबईवार्या केल्याची माहिती एआययूकडून मिळते. तसेच १८ जूनला तिने दिड लाखांचा कर भरून वस्तू नेल्या होत्या.