पोलिसांकडून ६३ तळीरामांवर कारवाई

By Admin | Updated: August 6, 2015 22:08 IST2015-08-06T22:08:39+5:302015-08-06T22:08:39+5:30

नवी मुंबई : शहरातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांविरुध्द नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत विशेष कारवाई मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कारवाईअंतर्गत ६३ मद्यपी चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली.

Action by 63 police personnel on slalom | पोलिसांकडून ६३ तळीरामांवर कारवाई

पोलिसांकडून ६३ तळीरामांवर कारवाई

ी मुंबई : शहरातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांविरुध्द नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत विशेष कारवाई मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कारवाईअंतर्गत ६३ मद्यपी चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली.
पामबीच मार्गावर घडत असलेले अपघात लक्षात घेता २७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान वाशी, सीवूड्स व सीबीडी या वाहतूक शाखांच्या हद्दीमध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत विशेष कारवाई मोहीम हाती घेण्यात आली होती. नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उप आयुक्त अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत वाशी वाहतूक शाखेतर्फे १२, सीबीडी वाहतूक शाखेतर्फे १७ आणि सीवूड्स वाहतूक शाखेतर्फे ३४ अशा एकूण ६३ मद्यपी चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील इतर वाहतूक शाखांमधून अतिरिक्त पोलीस कर्मचार्‍यांचे बळ वाशी, सीवूड्स व सीबीडी या वाहतूक शाखांना पुरविण्यात आले होते. अपघात टाळण्याच्या दृष्टिकोनातून चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Action by 63 police personnel on slalom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.