पिझ्झाच्या २० दुचाकींवर कारवाई
By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:33+5:302015-08-22T00:43:33+5:30
पिझ्झाच्या २० दुचाकींवर कारवाई

पिझ्झाच्या २० दुचाकींवर कारवाई
प झ्झाच्या २० दुचाकींवर कारवाई -आरटीओ : परिवहन वाहन म्हणून नोंदच नाहीनागपूर : शहरात घरोघरी पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या बाईकस्वारावर आरटीओने ब्रेक लावला आहे. बाईकवरून पिझ्झाची डिलिव्हरी करायची असेल तर परिवहन (ट्रान्सपोर्ट) कर भरा व पेटीचा आकार नियमानुसार ठेवा असा दम भरत तीन दुचाकी जप्त केल्या तर २० दुचाकींना शुक्रवारी नोटीस बजावली. मोटार सायकल, कार, जीप, शेतीचा ट्रॅक्टर, अपंगाचे वाहन आदींचा वापर खासगी प्रकाराच्या वाहन प्रकारात येतो. मात्र या वाहनांचा वापर भाडे घेऊन धंद्यासाठी होत असल्यास त्या वाहनाची आरटीओमध्ये (प्रादेशिक परिवहन कार्यालय) ट्रान्सपोर्ट वाहन म्हणून नोंद करणे आवश्यक असते. शहरातील काही कंपन्यांनी पिझ्झा डिलिव्हरी करण्याची जबाबदारी दुचाकीस्वारांना दिली आहे. दुचाकीचा वापर धंद्यासाठी होत असल्याने आरटीओच्या नियमानुसार या दुचाकीची ट्रान्सपोर्ट वाहन म्हणून नोंद करणे आवश्यक होते. परंतु याची नोंद न करताच व्यवसाय धडाक्यात सुरू आहे. या शिवाय नियमानुसार पेटीचा आकार नसल्यास कारवाईचे निर्देशही नुकतेच परिवहन विभागाने दिले आहे. त्यानुसार आरटीओ, शहर कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात पिझ्झाची डिलिव्हरी करणाऱ्या तीन दुचाकीस्वाराची वाहने जप्त करण्यात आली तर २० दुचाकीस्वारांना नोटीस बजावण्यात आली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार संबंधित कंपन्यांच्या ७०वर दुचाकी आहेत. यावर परिवहन कर म्हणून साधारण १४ लाख २१ हजार रुपये भुर्दंड पडण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात संबंधित कंपन्यांनी पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या पेट्याच काढून टाकल्या होत्या, त्यामुळे हे प्रकरणच मिटले होते. परंतु पावसाळा लागताच पुन्हा या पेट्या दिसू लागल्या आहेत.