64 विहिरींचे अधिग्रहण, 19 टँकरचे प्रस्ताव धूळखात अक्कलकोट : पाणीटंचाई तीव्र

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:21+5:302015-08-27T23:45:21+5:30

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात पावसाने गेल्या अडीच महिन्यांपासून ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद होत आहे. परिणामी गावात वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आह़े सध्यस्थितीत 46 गावे, 8 वाड्यांसाठी तब्बल 64 विहिरी अधिग्रहण तर टँकर बैलगाडी पाणीपुरवठाकामी संख्या 19 इतकी आहे; मात्र हे प्रस्ताव देऊनही काहीच परिणाम होत नसल्याने हे धूळखात पडले की काय अशी शंका निर्माण झाली आह़े अक्कलकोट शहरात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आह़े

Acquisition of 64 wells, 19 tankers proposed in Dhakkhata Akkalkot: Water shortage intensified | 64 विहिरींचे अधिग्रहण, 19 टँकरचे प्रस्ताव धूळखात अक्कलकोट : पाणीटंचाई तीव्र

64 विहिरींचे अधिग्रहण, 19 टँकरचे प्रस्ताव धूळखात अक्कलकोट : पाणीटंचाई तीव्र

्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात पावसाने गेल्या अडीच महिन्यांपासून ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद होत आहे. परिणामी गावात वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आह़े सध्यस्थितीत 46 गावे, 8 वाड्यांसाठी तब्बल 64 विहिरी अधिग्रहण तर टँकर बैलगाडी पाणीपुरवठाकामी संख्या 19 इतकी आहे; मात्र हे प्रस्ताव देऊनही काहीच परिणाम होत नसल्याने हे धूळखात पडले की काय अशी शंका निर्माण झाली आह़े अक्कलकोट शहरात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आह़े
दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाई आराखडा पाठविला असून अक्कलकोट पंचायत समितीने जिल्हा प्रशासनाकडे 38 लाख 68 हजार इतका खर्च अपेक्षित ठेवला आह़े मागील वर्षी याच महिन्यात जवळपास सर्रास गावांना मुबलक पाणी होत़े यामुळे टँकर, विहीर अधिग्रहणाची आवश्यकता भासत नस़े; मात्र यंदा पावसाळा चालू होऊन अडीच महिने उलटून गेले; मात्र अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही़ प्रस्ताव सादर करून 8 दिवस झाले तरी अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आह़े
इन्फो बॉक्स़़़़़़़़़़
विहीर अधिग्रहणासाठी प्रस्तावित गावे व रक्कम
बणजगोळ 27 हजार, बादोले खु 27 हजार, चप्पळगाववाडी, दुधनी, भीमनगर, हालहळ्ळी, हंजगी, कलहिप्परगे, किरनाळी, मातनहळ्ळी तांडा, नाविंदगी, सर्मथनगर, शावळ, शावळतांडा, बोरगाव, बोरेगाव, नागोरे या गावासाठी प्रत्येकी 27 हजार रुपये खर्च आहे तर हन्नुर, दुधनी, तोळणूर, करजगी, वसंतराव नाईकनगर, हालचिंचोळी, मंगरुळ, तडवळ, चिक्केहळ्ळी, परमानंद तांडा, डोंबरजवळगे, कर्जाळ, सुलेरजवळगे आदी गावांना प्रत्येकी 18 हजार रुपये खर्च अपेक्षित आह़े तर एकंदरीत 46 गावांसाठी विहीर अधिग्रहण प्रस्तावित आहेत़
इन्फो बॉक्स़़़़़़़़़़
अक्कलकोट तालुक्यात 25 टँकरसाठी 25 हजार खर्च अपेक्षित आह़े एकंदरीत 46 गावातील 1 लाख 19 हजार 273 नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत़ यासाठी 38 लाख 68 हजारांचा खर्च अपेक्षित आह़े
इन्फो बॉक्स़़़़़़़़़़
पेयजल योजना कुचकामी़़़़़़़़़
ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत तालुक्यात पेयजल योजना राबविण्यात आली़ या योजनेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले; मात्र पाणीटंचाई निर्माण झाली यावरून विभागाने केलेल्या पेयजल योजनेवरील कामांवर शंका निर्माण होत आह़े

Web Title: Acquisition of 64 wells, 19 tankers proposed in Dhakkhata Akkalkot: Water shortage intensified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.