शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

'अच्छे दिन' वास्तवात कधीच नसतात; नितीन गडकरींचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 15:26 IST

 प्रत्येक माणूस हा असमाधानी असतो, त्यामुळे वास्तवात 'अच्छे दिन' कधीच नसतात.

नवी दिल्ली- सुख हे मानण्यावर असतं, या उक्तीच्या आधारे, 'अच्छे दिन' हे मानण्यावर असतात, असं 'लॉजिक' मांडत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मोदी सरकारचा बचाव केला आहे.  प्रत्येक माणूस हा असमाधानी असतो, त्यामुळे वास्तवात 'अच्छे दिन' कधीच नसतात, असा युक्तिवाद त्यांनी केला. 

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 'रोड टू २०१९  : स्पीड बम्प अहेड?' या विषयावरील चर्चासत्रात नितीन गडकरी सहभागी झाले होते. देशात 'अच्छे दिन' आले, असं भाजपा २०१९च्या प्रचारात ठामपणे म्हणू शकेल का?, असा प्रश्न विचारल्यानंतर गडकरींनी थोडा सावध पवित्रा घेतला. 

'जो नगरसेवक असतो, त्याला आमदार व्हायचं असतं, आमदाराला खासदारकी खुणावत असते, खासदाराला मंत्री होण्याचं स्वप्न पडतं आणि मंत्र्यांना चांगल्या खात्याचं मंत्री व्हायचं असतं. ज्याच्याकडे मर्सिडीज असते तोही दुःखी असतो आणि बाइक असते तोही. अच्छे दिन हे मानण्यावर असतात. रोटी, कपडा और मकान म्हणजेच अच्छे दिन', असं जीवनाचं तत्वज्ञानच नितीन गडकरींनी सांगितलं. पंतप्रधान आवास योजनेतून घर बनत नाहीएत का?, सागरमाला प्रकल्पात १६ लाख कोटींची गुंतवणूक झालीय. हे अच्छे दिन नाहीत का?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. काँग्रेसने जे ५० वर्षांत केलं नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखवलं. सगळ्या अपेक्षा पाच वर्षांत पूर्ण होऊही शकत नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं. 

२०१९ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचं काँग्रेसचं स्वप्न हे मुंगेरी लालच्या स्वप्नासारखंच आहे, असा टोला गडकरींनी लगावला. ईशान्य भारतातील निवडणुकीत त्यांची काय अवस्था झाली बघा, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा