शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लंकेश हत्या प्रकरणाच्या वार्तांकनावर अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिकनची लाज वाटते असं सांगत पत्रकाराचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 12:10 IST

गौरी लंकेश हत्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीनं चुकीची भूमिका घेतल्याचा दावा करत चॅनेलची पत्रकार सुमन नंदीने राजीनामा दिला व फेसबुकच्या माध्यमातून चीड व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देरिपब्लिक टिव्हीनं ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येचं वृत्तांकन केलं ते शरम वाटणारंसौदी अरेबिया व उत्तर कोरिया या दोन देशांप्रमाणेच भारतातल्या पत्रकारितेची अवस्था होईल असा इशारा

मुंबई, दि. 8 - अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टिव्ही बातमीशी ईमान राखत नसल्याचा आरोप करत एका पत्रकारानं राजीनामा दिला आहे. गौरी लंकेश हत्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीनं चुकीची भूमिका घेतल्याचा दावा करत चॅनेलची पत्रकार सुमन नंदीने राजीनामा दिला व फेसबुकच्या माध्यमातून चीड व्यक्त केली आहे.

अत्यंत अप्रामाणिक सरकारची, म्हणजे भाजपा प्रणित केंद्र सरकारची बाजू घेत रिपब्लिक टिव्हीनं ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येचं वृत्तांकन केलं ते शरम वाटणारं असल्याची चीड त्यांनी व्यक्त केली आहे. "भाजपा व आरएसएसच्या लोकांकडून धमक्या आल्यानंतर गौरी यांची निर्घृण हत्या झाली. अशा खुन्यांना प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही विरोधकांवर प्रश्नांचा भडीमार कसा काय करता? तुमची कामाप्रती निष्ठा कुठे गेली?" असा सवाल नंदी यांनी रिपब्लिक टिव्हीला विचारला आहे.

प्रस्थापितांविरोधात आवाज उठवणाऱ्या लंकेश यांची राहत्या घरी मंगळवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कट्टर उजव्या विचारसरणीविरोधात आवाज उठवण्यासाठी लंकेश प्रसिद्ध होत्या. त्यांची हत्या झाल्यानंतर पुन्हा एकदा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विरोधकांना कायदेशीर मार्गाने आपला आवाज मांडता येणार की नाही. का विरोधी मत व्यक्त केल्यावर थेट हिंसाचारास सामोरे जावं लागू शकतं असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

रिपब्लिकच्या वृत्तांकनाबाबत बोलताना नंदी यांनी सौदी अरेबिया व उत्तर कोरियाच्या सरकारी निर्बंधातील पत्रकारितेचा हवाला दिला आहे. या दोन देशांप्रमाणेच भारतातल्या पत्रकारितेची अवस्था होईल असा इशारा त्यांनी दिला आहे. जर लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभानं आपला आत्मा विकला तर समाजाची काय अवस्था होईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. रिपब्लिकनसारख्या बेईमान संस्थेत काम केल्याबद्दल आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशSocial Mediaसोशल मीडिया