बनावट कागदपत्रांद्वारे आरोपीचा जामीन
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:05+5:302015-08-02T22:55:05+5:30
बोगस कागदपत्राद्वारे आरोपीचा जामीन

बनावट कागदपत्रांद्वारे आरोपीचा जामीन
ब गस कागदपत्राद्वारे आरोपीचा जामीन गुन्हा दाखल : कामठी येथील प्रकारकामठी : नागपूर तहसील कार्यालयातून बोगस सॉल्व्हन्सी तयार करून ती आरोपीच्या जामिनासाठी कामठी येथील न्यायालयात सादर करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच कामठी पोलिसांनी न्यायालयाचे प्रभारी सहायक अधीक्षक विनोद आगलावे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपी आकाश ठाकूर याच्याविरोधात कामठी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. कामठी येथील न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याचा जामीन घेण्यासाठी मथुरा बाबूलाल तिवारी याने नागपूर तहसील कार्यालयातून सॉल्व्हन्सी तयार केली आणि ती कामठी येथील न्यायालयात २ जुलै रोजी सादर केली. न्यायालयाचे प्रभारी सहायक अधीक्षक आगलावे यांना शंका आल्याने त्यांनी या सॉल्व्हन्सीबाबत कामठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून पडताळणी करण्याची सूचना केली. चौकशीअंती ती बोगस असल्याचे स्पष्ट होताच आगलावे यांनी मथुरा तिवारी, रा. नागपूर याच्याविरोधात कामठी पेालीस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी कामठी पोलिसांनी भादंवि ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४६९, १९३, १९८ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी मथुरा तिवारी याचा शोध घेणे सुरू केले आहे. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चौगावकर करीत आहेत. (प्रतिनिधी)***