शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

हत्येचा आरोप, जन्मठेपेची शिक्षा, ४२ वर्षे तुरुंगात, अखेर १०० व्या वर्षी कोर्टाने केली निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:36 IST

Court News: न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानूवर्षे प्रलंबित राहणारे खटले, न्यायदानात होणारी दिरंगाई ही भारतीयांसाठी नवी नाही. अशीच एक अजब घटना समोर आली आहे. येथील अलाहाबाद उच्च न्यायालयाने १०० वर्षांच्या एका वयोवृद्ध आरोपाची खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.

न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानूवर्षे प्रलंबित राहणारे खटले, न्यायदानात होणारी दिरंगाई ही भारतीयांसाठी नवी नाही. अशीच एक अजब घटना समोर आली आहे. येथील अलाहाबाद उच्च न्यायालयाने १०० वर्षांच्या एका वयोवृद्ध आरोपाची खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. या व्यक्तीला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तसेच त्याने या शिक्षेला न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र हा खटला सुमारे ४० वर्षे चालला. तसेच अखेरीस त्याची न्यायालयाने या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. मात्र या दिरंगाईमुळे या व्यक्तीला प्रचंड मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागला.

धनी राम असं वयाच्या १०० व्या वर्षी खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. १९८२ साली जमिनीच्या वादातून एक हत्या झाली होती. या प्रकरणी मैकू, सत्ती दीन आणि धनी राम यांच्यावर आरोप झाला होता. यापैकी मैकू हा फरार झाला होता. तर हमीरपूर सेशन्स कोर्टाने १९८४ मध्ये सत्ती दीन आणि धनी राम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धनीराम त्याच वर्षी जामिनावर मुक्त झाला होता. तर सत्ती दीन याचा अपीलादरम्यान, मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रकरणात धनी राम हा एकमेव जीवित अपीलकर्ता उरला होता.

या प्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह आणि न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्या विभागीय खंडपीठाने अपिलासाठी बराच काळ झालेला उशीर, आरोपी धनी राम याचं वय या बाबी दिलासा देण्यासाठी सबळ कारण आहेत. असे सांगितले. त्याबरोबरच सरकारी पक्ष आरोपींवर कुठल्याही संशयाशिवाय आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरले ही बाबही खंडपीठाने अधोरेखित केली.  तसेच आरोपीने अनेक वर्षे झेललेली चिंता, अनिश्चितता आणि सामाजिक परिणाम याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही न्यायमूर्तींनी नमूद केले.

दरम्यान, धनी राम याची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याच्या वकिलाने सांगितले की, अपिलकर्त्याचं आजचं वय हे १०० वर्षे आहे. तसेच त्याने केवळ माइकू याला पीडितावर गोळीबार करण्यासाठी चिथावणी दिली होती.  

English
हिंदी सारांश
Web Title : Acquitted at 100: Man Freed After 42 Years in Prison

Web Summary : A 100-year-old man, Dhani Ram, was acquitted by the Allahabad High Court after serving 42 years for a 1982 murder. Initially sentenced to life, the court cited prolonged delays and the prosecution's failure to prove guilt beyond doubt, acknowledging the immense hardship he endured.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश