२७ वर्षापासून फरार आरोपीस अटक
By Admin | Updated: January 30, 2016 00:17 IST2016-01-30T00:17:37+5:302016-01-30T00:17:37+5:30
विशेष अभियान : लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

२७ वर्षापासून फरार आरोपीस अटक
व शेष अभियान : लोहमार्ग पोलिसांची कामगिरीनागपूर : अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. मोहिमेंतर्गत मागील दोन दिवसात २६ ते २७ वर्षांपासून फरार असलेल्या २ आरोपींना अटक करण्यात यश प्राप्त झाले आहे.लोहमार्ग पोलिसांनी फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत ललित कांतीलाल व्यास (५८) रा. नेताजीनगर कळमना नागपूर या आरोपीस २६ वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. त्याने १९९० मध्ये एका शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेंव्हापासून तो फरार होता. दरम्यान तो नागपुरातून वर्धा शहरात राहण्यासाठी गेल्याची गुप्त माहिती लोहमार्ग पोलिसांना समजली. त्यानुसार त्यास २६ वर्षानंतर वर्धा शहरातून अटक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत आरोपी कुणाल विठोबा उरकुडे (४५) रा. हेलोडी ता. सेलू जि. वर्धा या आरोपीला अटक करण्यात आली. चोरी केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध १९८९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला सेलू तालुक्यातील हेलोडी येथून त्याच्या राहत्या घरून अटक करण्यात आली. तब्बल २७ वर्षानंतर या आरोपीस पकडण्यात लोहमार्ग पोलिसांना यश मिळाले. ही कारवाई लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उप निरीक्षक खुशाल शेंडगे, रविंद्र सावजी, विनोद नांदे यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)..................