विनापरवाना वाळूसाठाप्रकरणी आरोपी निदार्ेष
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:42+5:302015-08-26T23:32:42+5:30
सोलापूर : पोखरापूर येथील मुलाणी यांच्या शेतात विनापरवाना ४०० ब्रास वाळूसाठा केल्याप्रकरणी दिनेश रामचंद्र गाडे (रा. मोहोळ) याची मोहोळ न्यायालयातील न्यायदंडाधिकारी व्ही. ई. भंडारी यांनी निदार्ेष मुक्तता केली.

विनापरवाना वाळूसाठाप्रकरणी आरोपी निदार्ेष
स लापूर : पोखरापूर येथील मुलाणी यांच्या शेतात विनापरवाना ४०० ब्रास वाळूसाठा केल्याप्रकरणी दिनेश रामचंद्र गाडे (रा. मोहोळ) याची मोहोळ न्यायालयातील न्यायदंडाधिकारी व्ही. ई. भंडारी यांनी निदार्ेष मुक्तता केली. महसूल खात्याच्या पथकाला कुणकुण लागताच वाळूचा साठा जप्त केला. तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी दिनेश गाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. महसूल अधिकार्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी महसूल जमीन कायदा व पर्यावरण कायद्यातील आवश्यक त्या तरतुदींचा अवलंब केला नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड. मसरुर उर्फ एम. ए. इनामदार यांनी केला. तो युक्तिवाद ग्रा धरून न्यायालयाने आरोपीची निदार्ेष मुक्तता केली. सरकारतर्फे ॲड. विनोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)