चेंगराचेंगरीवरून आरोप-प्रत्यारोप

By Admin | Updated: October 5, 2014 01:44 IST2014-10-05T01:44:47+5:302014-10-05T01:44:47+5:30

शुक्रवारी देशभर विजयादशमी सण साजरा होत असताना पाटण्यातील गांधी मैदानावर दसरा महोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीतील बळींची संख्या 33 वर पोहोचली आह़े

Accusations and allegations on the stampede | चेंगराचेंगरीवरून आरोप-प्रत्यारोप

चेंगराचेंगरीवरून आरोप-प्रत्यारोप

>पाटणा : शुक्रवारी देशभर विजयादशमी सण साजरा होत असताना पाटण्यातील गांधी मैदानावर दसरा महोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीतील बळींची संख्या 33 वर पोहोचली आह़े 29 जण जखमी असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळत़े
दरम्यान या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणो सुरू झाले आह़े विरोधी पक्ष भाजपा तसेच लोजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी या दुर्घटनेसाठी राज्यातील जदयू-राजद-काँग्रेस सरकारला दोषी ठरवले आह़े तर सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राजदचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी याचे खापर जिल्हा प्रशासनाच्या माथ्यावर फोडले आह़े खुद्द जिल्हा प्रशासनाने मात्र आपल्यावरील सर्व दोषारोपण खोडून काढत दु:खद घटना गर्दीत जीव गुदमरल्यामुळे झाल्याचा दावा केला आह़े
दरम्यान या दुर्घटनेमागे प्रशासनाची काहीही चुक नसल्याचा दावा जिल्हाधिकारी मनीष कुमार वर्मा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला़ वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनु महाराज हेही त्यांच्या सूरात सूर मिसळताना दिसल़े सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेंगराचेंगरीचे कुठलेही दृश्य दिसत नाही़ विशाल संख्येत लोक चालत आहेत आणि अचानक काही लोक पडत आहेत, काहीजण त्यांना उचलत आहे, असे फुटेजमध्ये दिसत़े यावरून ही दुर्घटना लोकांचा जीव गुदमरल्यामुळे झाल्याचे वाटते, असे वर्मा म्हणाल़े  रामगुलाम चौकात उच्च क्षमतेचा लाईट बंद पडला होता़़ कमी प्रकाशामुळे सीसीटीव्ही फुटेज निर्णायक मानता येणार नाही, असेही ते म्हणाल़े  
मनू महाराज यांनी लाठीमार झाल्याचा इन्कार केला़  प्रशासन लोकांना परमेश्वराच्या भरवशावर सोडून मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यात व्यस्त होत़े त्यामुळे 33 लोकांना आपले जीव गमवावे लागल़े, असा आरोप भाजपानेते सुशील कुमार मोदी यांनी केला. चेंगराचेंगरी ही बिहार सरकारचा निष्काळजीपणा, असंवेदनशीलतेचा परिपाक असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाद्वारे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Accusations and allegations on the stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.